उपनिरीक्षकासह दोन पोलिस निलंबीत: भोसा येथील प्रकरण

0
14

महेश मेश्राम
आमगाव, दि. ३० तालुक्यातील भोसा येथे चार महिन्यांपूर्वी शाळेतील रोजंदारी महिलेवर आरोपी गोपाल जनीराम कारंजेकर (वय ३६) याने शाळेतील स्वच्छतागृहात बळजबरीने अतिप्रसंग केला होता. या प्रकरणात सुरवातीला पोलिस कर्माचाèयांनी योग्य दखल न घेत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या तक्रारीवरून उपनिरीक्षक जयदीप काटे, श्यामकुवर देशपांडे (ब.नं.७४३), श्रीधर झाडूजी पटले (ब.न.८१२) या तिघांना २८ जुलै रोजी निलंबीत करण्यात आले.
आमगाव तालुक्यातील भोसा येथील तुकाराम हायस्कूल येथे स्थानिक महिला रोजंदारी कामावर होती. याच शाळेत गोपाल जनीराम कारंजेकर हा सुद्धा कामावर आहे. गोपाल याने शाळेत २७ मार्च २०१६ रोजी एकांताचा फायदा घेत कामावर महिलेला तिचे तोंड दाबून स्वच्छता गृहात जिवे मारण्याची धमकी देत अतिप्रसंग केला. यावेळी आरोपीची पत्नी घटनास्थळावर पोहोतचात तिने बलात्कार पिडीत महिलेला मारहाण केली. यात गोपालनेही उलट त्या पिडीतेला मारहाण करीत जखमी केले होते. प्रकरणाची बाब पिडीत महिलेने घरी आपल्या पतीस सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य घेत पती व पिडीत महिलेने पोलिस ठाणे घाठून घटनेची नोंद करण्यासाठी फिर्याद दिली. परंतु या प्रकरणात पोलिस शिपाई श्यामकुवर देशपांडे, श्रीधर झाडूजी पटले व पोलिस उपनिरीक्षक यांनी पिडीताला मारहाण झाल्याची नोंद करीत आरोपी च्या विरुद्ध गुन्हा नोंद करून अतिप्रसंगाचा गुन्हा दडपण्यात आला. प्रकरणाची माहिती गावातील नागरिकांना मिळताच नागरिकांनी उपविभागीय अधिकारी दिपाली खन्ना यांच्याशी संपर्क केला. त्यामुळे ३० मार्च रोजी आरोपी विरुद्ध पुन्हा बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला. यापुर्वी प्रकरणातील सर्व पुरावे दडपण्यासाठी विभागातील पोलिस शिपाई श्यामकुवर देशपांडे यांनी दबाव आणल्याची तक्रार पिडीत महिलेने केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांनी महिलेला न्याय मिळवून दिला. चौकशी अहवालात दोषी आढळल्यामुळे पोलिस अधिकारी आणि दोन पोलिस कर्माचाèयांना निलंबित करण्यात आले.