आरोग्य सेविकेचे लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन

0
14

निलंबनाची मागणी

देवरी- ग्रामीण रुग्णालयात कार्यरत अश्विनी बंसोड या परिचारिकेने पदाधिकाèयांशी गैरवर्तन केल्याची तक्रार आमदार संजय पुराम यांचेकडे करण्यात आली आहे. दरम्यान, या परिचारिकेला सेवेतून निलंबित करण्याची मागणी सभापती देवकी पुराम यांचेसह अन्य पदाधिकाèयांनी केली आहे.
सविस्तर असे की, गेल्या २२ तारखेला भर्रेगाव पंस क्षेत्राचे सदस्य मेहतर कोराम हे स्थानिक रुग्णालयात ओळखीच्या रुग्णाला भेटण्यास गेले असता कर्तव्यावर असलेल्या अश्विनी बंसोड या परिचारिकेने कोराम यांचेशी गैरवर्तन करून अपमानित केले. यासंदर्भात देवरीच्या सभापती सत्यता पडताळून पाहण्यासाठी गेल्या असता त्यांनी तोच अनुभव आला. मी कोणत्याही मंत्री, खासदार आणि आमदाराला घाबरत नसल्याचे सांगून पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिल्याचे संबंधित पदाधिकाèयांनी आमदार संजय पुराम यांना लेखी निवेदनातून कळविले आहे. सदर परिचारिकेने तर सभापतींना तुमची आरती ओवाळायची काय, असे उद्धट उत्तर दिले. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी पं.स. सदस्य महेंद्र मेश्राम यांना सुद्धा असाच अनुभव आल्याचे सांगितले जाते.