डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी सुट्टी जाहिर करा – आमदार प्रकाश गजभिये

0
12

नागपूर,दि.05 : भारतीय संविधानाचे शिल्पकार उपेक्षित शोषितांचे उध्दारकर्ते डाॅ.बाबासाहेब अंाबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सूट्टी जाहिर करण्याची मागणींचे निवेदन राष्ट्रवादी काॅंग्र्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यंानी विधानपरिषद सभापती मा. रामराजे निंबाळकर व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
प.पू.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरीता चैत्यभूमी येथे राज्यातून नव्हे तर संपूर्ण देशातून अनुयायी येतात, तसेच मंत्री, खासदार, आमदार आदी मोठया संख्येनी चैत्यभूमीला येतात, त्यामुळे विधीमंडळात दोन्ही सभागृहाचे सदस्य अनुपस्थीत असतात, संपूर्ण राज्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा, कार्यक्रम घेण्यात येतात. देशाच्या भारतीय संविधानाला 60 वर्षे झालीत तसेच महापरिनिर्वाणाला सुध्दा 60 वर्षे पूर्ण झालीत परंतु यादिवशी सुट्टी नाही ही शोकांतिका आहे. यामुळे देशातील लाखो अनुयायी सुट्टी नसल्यामुळे डाॅ.बाबासाहेब अंाबेडकर यंाच्या दर्शनास मुकले आहे. आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेता शासनाने त्वरीत दखल घेवून 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी सुट्टी जाहिर करावी,अशी आमदार गजभिये यंानी मागणी केली.