शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

0
17

बुलडाणा,दि.24 :  सरकार मस्त व जनता त्रस्त अशी स्थिती सध्या देशात, राज्यात व जिल्ह्यात झालेली आहे. जनतेचा आक्रोश सरकारी दरबारी दाबला जात आहे, हाच आक्रोश शिवसेना बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात हजारो लोकांनी मोर्चाच्या रुपाने २४ आॅक्टोबर रोजी व्यक्त केला.
महागाई शेतकºयांच्या फाशीसह विविध देखाव्यासह शिवालय या संपर्क कार्यालयापासून निघालेला मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजारगल्ली, सराफालाईन, संभाजीनगर, कारंजाचौक, भोंडे सरकार चौक, तहसील चौक, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे विविध भाषणे झाली. त्यानंतर जिल्हाधिका-यांना विविध मागण्यांचे  निवेदन देण्यात आले. त्यामध्ये जाहीर केल्याप्रमाणे सरसकट कर्जमाफी देऊन जाचक अटी रद्द करा, जीएसटी मुळे सर्वसामान्य नागरिकांची, व्यापा-यांची होणारी आर्थिक लूट थांबवून  रद्द करून पूवीर्ची कर प्रणाली कायम ठेवा. सोयाबीनला ५००० हजार रुपये हमीभाव जाहीर करून तात्काळ खरेदी केंद्रे जाहीर करा. कापसाला ६०००  रुपये हमीभाव जाहीर करून खरेदी केंद्र सुरू करा. सोयाबीन, उडीद, मूग विकलेल्या शेतकºयांना व्यापाºयांकडून कमी भाव मिळाल्याने हेक्टरी १०००० रुपये बोनस द्या. ग्रामपंचायतने मागविलेल्या घरकुलाच्या ड यादीनुसार लाभार्थ्यांना तसेच इंदिरा आवास योजनेअंतर्गत जुन्या रद्द केलेल्या याद्याप्रमाणेच लाभार्थ्यांना तात्काळ घरकुले मंजूर करा. शहरी व ग्रामीण भागातील लोडशेडिंग बंद करा व विज बिलासंबंधीच्या तक्रारी तात्काळ सोडवा. श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांची वयोमयार्दा ६५ वरून ६० वर्षे करा तसेच संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार, विधवा, परीतत्तश्वया व अपंग योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन वाढवून २००० रु करा. ५० वर्षे वयावरील शेतकरी व शेतमजुरांना तात्काळ पेन्शन योजना लागू करा आदी लोकोपयोगी मागण्या मोर्च्याच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली. शिवसेनेच्या या आक्रोश मोर्चात दोन जिवंत देखावे सादर करण्यात आले होते.
यावेळी मोर्चात शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब कोरके, महिला आघाडी, अर्पिताताई विजयराज शिंदे, जिल्हाप्रमुख सिंधुताई खेडेकर, चंदाताई बढे, शिव वाहतूक सेना जिल्हा प्रमुख संजय हाडे, शिव ग्राहक सेना जिल्हा प्रमुख गिरीश वाघमारे, तालुका प्रमुख अर्जून दांडगे, शिव वाहतूक सेना तालुकाप्रमुख संजय मोटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, देऊळगावराजा माजी तालुका प्रमुख प्रकाश गीते, कृष्णा झोरे, साहेबराव डोंगरे, शरदचंद्र पाटील, सुखदेव शिंबरे, रवी पाटील,  निलेश राठोड, शोभाताई पाटील, संगीता पवार, वैशाली ठाकरे, अंजना खुपराव, भारतीबाई, सागवन सरपंच कांताताई राजगुरे, अनुसया वाघमारे, हरिभाऊ सिनकार, दादाराव काटोले, विजय जायभाये, अशोक इंगळे, उमेश कापुरे, समाधान मोरे, मनोज यादव, राजेंद्र पवार, सुहास वानरे, दिलीप तोटे, पुरुषोत्तम हेलगे, हेमंत खेडेकर, कैलास माळी, राजेश ठोंबरे, संजय धंदर, पुरुषोत्तम नारखेडे, पुरुषोत्तम लखोटीया, गजानन कुºहाळे, माधव पाटील, माणिकराव सावळे, अनिल जगताप, र सुभाष लहाने, सुभाष पवार, ओमसिंग राजपूत, गोविंदा खुमकर, विनोद गव्हाणे, प्रकाश देशलहरा, सचिन परांडे, गजेंद्र दंडाडे आदींची उपस्थिती होती.