अखेर माजी आमदार दिलीप बनसोड यांची घरवापसी

0
8

गोंदिया-राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनसोड यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली होती.त्यानंतर पक्षाने त्याना निलqबत केले होते.त्यातच बनसोड यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पॅनल लढविण्याचा निर्णय घेतला होता.त्या निर्णयाने राष्ट्रवादीला जिल्ह्यात फटका बसला असता हे हेरुन अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेंत्याच्या चर्चेनंतर दिलीप बनसोड यांनी शरद पवार,प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी आमदार राजेंद्र जैन,जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर,म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी,मोहन बचवानी आदी उपस्थित होते.बनसोड यांच्या सेकडो कार्यकत्र्यांनी सुध्दा यावेळी त्यांच्यासोबत प्रवेश केला.