काश्‍मीरमध्ये लष्करी तळावर ग्रेनेड हल्ला

0
12

वृत्तसंस्था
श्रीनगर- दि. १४-कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जवान जखमी झाल्याची घटना आज (बुधवार) दुपारी घडली. हिहामा येथे लष्करी तळावर दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्करी तळ परिसरात जवानांची निवासस्थानेदेखील आहेत.