उल्फा संघटनेचा नेता अनूप चेतिया भारताच्या ताब्यात

0
10

नवी दिल्ली, दि. ११ – युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य आणि भारतात हत्या, खंडणी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला अनूप चेतियाला बांगलादेशने भारताच्या ताब्यात दिले. छोटा राजनपाठोपाठ चेतियालाही भारतात परत आणण्यात केंद्र सरकारला यश आले आहे.

अनूप चेतिया हा उल्फा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य असून त्याला १९९७ मध्ये बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली होती. घुसखोरी करणे, बोगस पासपोर्ट व बेकायदेशीररित्या परदेशी चलन बाळगणे या कलमांखाली त्याला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यादरम्यान चेतियाने तीन वेळा बांगलादेशकडे राजनैतिक शरणागती मागितली होती. २००३ मध्ये बांगलादेशमधील हायकोर्टाने त्याला तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले होते.