नक्षल्यांकडून आणखी एका युवकाची हत्या

0
12

गडचिरोली, दि.१६: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(ता.१५)रात्री सिरोंचा तालुक्यातील पातागुडम येथील एका युवकाची गोळया घालून हत्या केली. संतू गोरगोंडा असे मृत युवकाचे नाव आहे.

काल सशस्त्र नक्षलवादी संतूच्या घरी गेले. त्याला गावाबाहेर नेऊन गोळया घालून त्याची हत्या केली. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन ही हत्या करण्यात आली आहे. सिरोंचा एरिया कमिटीच्या नक्षल्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून सिरोंचा तालुक्यात नक्षल्यांच्या हिंसक कारवाया थांबल्या होत्या. परंतु संतूची हत्या झाल्याने पुन्हा त्या भागात नक्षल्यांनी डोके वर काढले आहे. एक दिवसापूर्वीच नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील गडेरी येथील सोबू जोगी गोटा या युवकाला ठार केले होते.