जेएनयूमधील राष्ट्रविरोधी घोषणांच्या विरोधात अभाविप रस्त्यावर

0
5

गडचिरोली, दि,२०: देशातील नामांकित जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काही विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भारतविरोधी घोषणा दिल्याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकात निदर्शने केली.

भारतीय संसदेवर हल्ल करणारा दहशतवादी अफजल गुरु याला फाशी दिल्याच्या घटनेला तीन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जेएनयूमधील काही डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून भारतविरोधी घोषणा दिल्या. देशातील महाविद्यालयीन वातावरण दूषित करण्याचा हा प्रकार असल्याची टीका करुन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी डाव्या विद्यार्थी संघटनांचा निषेध केला.