बोरवेलच्या खड्डयात पडलेल्या विवेकचा मृत्यु ?

0
4

राष्टीय सुरक्षा अकादमी आणि सेनेचे प्रयत्नांना अपयश ,
खड्डयात 65 फीट पर्यंत पाणी असल्याने विवेकच्या  मृत्युची शक्यता
गोंदिया,दि.10- सडक अर्जुनी तालुक्यातील राका पळसगाव येथे 9 मार्च ला सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास बोरवेल मध्ये पडलेल्या विवेवचा खड्डयातच मृत्यु झाल्याचे आज खोदकाम व बचावकार्यात प्रयत्न करीत असलेल्या रेस्क्यु पथकांतील अधिकारी व सदस्यांचे म्हणणे आहे.मात्र जोपर्यंत अधिकारीक घोषणा होत नाही,तोपर्यंत मात्र विवेक मृत्यु पावल्याचे स्पष्ट करता येत नाही. गोंदिया जिल्हयातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका येथे चांदेवार यांच्या शेतातील खुल्या बोरवेलच्या 275 फीट खोल खड्डयात विवेक बुधवारला दुपारच्या सुमारास पडला होता. काल सायंकाळपासूनच स्थानिक यंत्रणा सह जिल्हा प्रशासन व आपत्तीविभागा कडून विवेकला वाचविण्याचे भरपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. आज 10 मार्च ला दुपारी 1 वाजताच्या सुमारास पुणे येथील एनडीआरएफ चे पथक घटनास्थळी पोहचले त्यांच्या माध्यमातून विवेकला जिवंत काढण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात आले. पण त्यांचेही रेस्क्यु आॅपरेशन फोल ठरले. रात्री वृत्तलिहिपर्यंत विवेकला बाहेरकाढण्यात आले नव्हते.
सडक अर्जुनी तालुक्यातील राका पळसगाव येथील शेतात बुधवारी (ता. ९) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. घटना उघडकीस येताच बचावकार्याला गती आली आहे.  प्रशासन घटनास्थळी तळ ठोकून आहे. विवेक खुशाल दोनोडे (4 वर्ष रा. राका पळसगाव ) असे खड्यात पडलेल्या बालकाचे नाव आहे. गोंदिया येथील अग्नीशमन पथक, जिल्हा आपात्ती निवारण केंद्राचे पथक आदी घटनास्थळी बुधवारला सायंकाळीच पोहाचले होते.तर जिल्हाधिकारी विजय सुर्यंवशी,अति.पोलिस अधिक्षक संदिप पखाले,जि.प.अध्यक्ष उषा मेंढे,सीईओ दिलीप गावडे,उपाध्यक्ष रचना गहाणे,सडक अर्जुनी प.स.सभापती कविता रंगारी,भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,माजी जि.प.उपा्ध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी रात्री उशीरापर्यंत तिथे हजर राहून बचाव कार्याची पाहणी केली.

जेसीबी व पोकलॅंड मशीन द्वारे बोअरवेलचा खड्डाच्या 5 फीट जवळएक दुसरा खड्डा खोदण्यात आला. तसेच विक्की पडलेल्या खड्डयात प्राणवायु सोडण्यात आले. पण त्या बोरवेलच्या खड्डयात पाणी भरलेला असल्यामुळे प्राणवायु विक्की पर्यंत पोहचत नव्हते. त्यामुळे नंतर प्राणवायुचा पुरवठा बंद करण्यात आला. प्राणवायु बंद करताच उपस्थित असलेल्या कुटंुबीय मंडळी तसेच ग्रामस्थांचे डोळे पाणावले व त्यांचे अखेर ची आशा ही संपुष्टात आली. खोदलेल्या खड्डयाची खोली 270 फीट पर्यंत होती. या खड्डयाला सीसीटीव्ही च्या माध्यमातून पाहण्यात आले असता 65 फीट पर्यंत पाणी भरलेला होता. तरीपण प्रशासनाकडून व आलेल्या बचाव पथकाकडून भरपूर प्रयत्न करण्यात आले. पण 24 तास चाललेला रेस्क्यु आॅपरेशन अपयशी ठरला. विक्की चा खड्डयातच मृत्यु झाला असल्याची शक्यता बळावली असल्यानंतर खड्डयात अग्निशमन विभागाच्या पथकाद्वारे गल खड्डयात टाकून विवेकचा शरीर बाहेर काढण्याचे प्रयत्न केले असता गळमध्ये अडकलेले कपडेच बाहेर आले विवेकचा देह पाण्यात असल्यामुळे फुगुन मोठा झाल्याने बाहेर येवू शकला नाही,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन विभागाच्या पथकांनी खड्डयातील 80 फुटापर्यंत त्या मृतदेहाला अडकवून ठेवले होते. आज दुपारी 1 वाजता पोहचलेल्या एनडीआरएफ च्या चमूने व कामठी येथील सेनेच्या चमूनीही रेस्क्यु आॅपरेशन मध्ये आपला हातभार लावला. या प्रसंगी घटनास्थळी गोंदियाचे जिल्हाधिकारी डाॅ. विजय सुर्यवंशी, पोलिस उपअधिक्षक संदीप पखाले, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे व कामठीचे सेनेचे ब्रिगेडियर सिंग या रेस्क्यु आॅपरेशन व पूर्णवेळ नजर ठेवून आहेत. बातमी लिहेपर्यंत रेस्क्यु आॅपरेशन सुरूच होता.