आसोली- बटाणा परिसरातील हजारो एकरांतील रब्बी पिके करपली

0
15

बाघ इटियाडोह प्रकल्पाची वक्रदृष्टी : शेतात पाणी पोहोचण्यापूर्वी पुरवठा बंद
गोंदिया,दि. १० : बाघ इटियाडोह प्रकल्पाच्या सिंचनावर परिसरात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात धान पिकाची लागवड करण्यात आली. हा परिसर शेवटच्या टोकावर आहे. रोवणीचे काम  जोमात सुरू आहे. प्रकल्पाच्या अधिकाèयांनी कालव्यांतून पाणी सोडले. परंतु, अद्याप बरबसपुरा, आसोली, बटाणा, मुंडीपार, नवरगाव कला आदी गावांत पाणी पोहोचलेच नसताना कालव्यातील पाणी पुरवठा बंद करण्यात आले. परिणामी रोवण्या खोळंबल्या असून पीक करपू लागले आहे. बाघ इटियाडोह उपविभाग आमगावचे उपविभागीय अभियंता बॅनर्जी यांनी जाणीवपुर्वक पाणी बंद करुन शेतकरी वर्गाची पिळवणुक केली.तर गोंदिया येथील कार्य.अभियंत्याची प्रभारी पद असलेलेय खालसा यांनीही याकडे लक्ष दिले नसल्याचे शेतकरी व नागरिकांचे म्हणने आहे.खालसा आणि बॅनर्जी यांच्या आपसी भाडंणाचा परिणाम शेतकरी वर्गाला भोगावे लागत आहेत.
आजही जिल्ह्यातील अर्थव्यवस्था शेतीतून निघणाèया उत्पादनावर चालते. शेतकèयांना सिंचनाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रत्येक शासन सत्तेत आल्यानंतर देते. परंतु, प्रत्यक्षात शेतकèयांचा वाली कुणीच नसल्याचे दिसून येते. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून जिल्ह्यात सिंचनाकरिता पाणी सोडण्यात येते. चालू रब्बी हंगामांत गोंदिया तालुक्यातील बरबसपूरा, बटाणा, आसोली, मुंडीपार, नवरगावकला, नवरगाव खुर्द, मोरवाही, ईर्री आदी गावांत रब्बी हंगामात हजारो एकरावर धानाची लागवड करण्यात आली. त्याकरिता बाघ इटियाडोह प्रकल्पाने रब्बीची लागवड करण्याची परवानगी दिली. पाणी सोडण्याची हमी देखील दिली. त्याभरवशावर शेतकèयांनी उसणवारी करून खरीपातील तोटा भरून काढण्याच्या दृष्टीने धान पीक लावले. सध्या रोवणीचा हंगाम सुरू आहे. त्याकरिता बाघ इटियाडोह प्रकल्पाने कालव्याला पाणी सोडले. परंतु, परिसरातील गावे शेवटच्या टोकावर असल्यामुळे पाणी उशीरा पोहोचते. या परिसरात पाणी पोहोचलेच नसताना प्रकल्प कार्यालयाने पाण्याचा पुरवठा बंद केला. परिणामी रोवणीची कामे खोळंबली. पीक करपू लागले. बँकेचे अधिकारी देखील कर्जवसुलीकरिता तगादा लावत आहेत. जप्तीची कारवाई सुरू आहे. अशा स्थितीत काय करावे? असा सवाल शेतकèयांपुढे आ वासून उभा आहे. तत्काळ जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप करून पाणी पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकèयांनी दिला.

धापेवाडाचा विद्युत पुरवठा खंडितच
हजारो हेक्टरला सिचनाची हमी देणार्या धापेवाडा उपसा सिंचन योजनेचा विद्युत पुरवठा चार दिवसांपूर्वी महावितरणने खंडीत केला. त्यामुंळे शेत करपले. विद्युत थकबाकी न भरल्यामुळे ही समस्या ओढवली. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटाने शेतकरी नागवला जात आहे. त्यामुळे कर्जाचा भार वाढतच चात आहे.