छत्तीसगडच्या केसेसवर गोंदियाची कुटुंबनियोजन उदिष्ठपुर्ती

0
28

 

खेमेंद्र कटरे
गोंदिया, दि.१३-लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी शासनाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास प्रोत्साहन दिले. दोन अपत्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी म्हणून तिसèया अपत्याला शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही असाही नियम करण्यात आला आहे.त्यातच राज्यसरकारच्या आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्याला कुटुंबनियोजनाचे वार्षिक उदिष्ठपुर्ती दिलेले आहे.त्यातच यावर्षी म्हणजे २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी गोंदिया जिल्ह्याला ९१८१ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उदिष्ठ देण्यात आले आहे.त्यापैकी फेबुवारी २०१६ पर्यंत ८५ टक्के उदिष्ठ पुर्ण झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणने आहेच. हे अभियान राष्ट्रीय हिताचे असले तरी आपले उदिष्ठ पुर्ण करण्यासाठी मात्र छत्तीसगड राज्यातील महिलांना आणले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.तर आरोग्य विभागाच्या देवरी तालुक्यातील ककोडी येथील एका आरोग्य सेविकेने तर चकक् आपण छत्तीसगडमधील अशा महिला घेऊन येतो आणि ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदिष्ठ पुर्ण झाले नसेल त्यांना मदत करीत असल्याचेही सांगितले.
अशाच प्रकार शनिवारला प्रत्यक्ष आमगाव तालुक्यातील तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्यानंतर उघडकीस आला.ज्या महिलांना तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आले त्यांचे घरापासूनचे अंतर किमान १०० ते १५० किमी एवढे आहे.त्यांच्या गावाला लागून असलेल्या राजनादंगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हणा किवा सिमाशेजारी असलेल्या महाराष्ट्राच्या आरोग्य केंद्रात न जाता त्या एवढ्या लांबच्या आरोग्य केंद्रात आल्याच कशा हा सुध्दा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आले असून त्या शस्त्रक्रिया जामखारी ,तिगाव व पानगाव येथील एएनएमच्या नावे नोंदविण्यात आले होते.जेव्हा की त्यांची स्वाक्षरी सुध्दा त्या फार्मवर शस्त्रक्रिया लोटूून १५ तास झाल्यावरही झालेली नव्हती. एकदोन दिवसात परत चार ते पाच महिलांना याठिकाणी आणण्यात येणार असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एकाने सांगितले
.याआधी ठाणा व पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासह ककोडी आरोग्य केंद्रात सुद्दा छ्त्तीसगडच्या महिलांना आणून कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या ४ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली त्या सर्व राजनांदगाव जिल्ह्यातील सुर्या तालुक्यातील मासुल,भारीटोला,केसोटोला व गोपू या गावच्या रहिवासी असून या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून किमान अतंर १०० ते १५० किमीच्या जवळपासचे आहे.राजनादांगव जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र असतानाही त्या महिलांना महाराष्ट्रातील आरोग्य सेविका तिथे जाऊन पैसाचे आमिष देऊन आणत असल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे या महिलाची शस्त्रकिया होऊन १६ तासाचा अधिक काळ लोटला परंतु त्यांचे शासकीय पक्के कागदपत्र ते आरोग्य केंंद्रात देऊ शकले नाही.तर त्यांना फक्त २००-२५० रुपये देऊन आणि जेवणाचा खर्च देऊनच परत पाठविले जाणार असल्याचेही कळले.शासकीय नियमानुसार धनादेश दिला जातो परंतु आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या तोंडी सुचनेनुसार त्यांना रोख स्वरुपात पैसे द्यावयाचे आहेत.त्यातही या महिलांची शस्त्रक्रिया शुक्रवारला सकाळी १० वाजेच्या सुमारास करण्यात आली.त्यानंतर येथील वैद्यकीय अधिकारी हेडाऊ यांनी रुग्णालयात थांबण्याएैवजी गावाची वाट दुपारी ३ वाजेच पकडली.त्यानंतर कुणीही वैद्यकीय अधिकारी आज शनिवारला सकाळी ९ वाजेभेट दिली तेव्हाही हजर नव्हते.त्यातच त्या महिलासंोबत आलेल्या नातेवाईक महिला आपले गावाचे नाव मात्र ककोडी सागंताता जसे त्यांना आणलेल्या व्यक्तीने सांगितले असावे.रुग्णाला रुग्णालयाच्यावतीने जेवणाची व्यवस्था असताना नातेवाईक आरोग्य केंद्राच्या परिसरातच स्वयंपाक करीत होते.तर काही महिला ज्या प्रसुतीसाठी आल्या होत्या त्यांना कालपासून कुणीच विचारणा केली नसल्याचे दिसून आले.

लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात मागील सहा वर्षात ५२ हजार ७३८ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सन २०१०-११ या वर्षात ९०७९ शस्त्रक्रिया झाल्या. सन २०११-१२ या वर्षात ९१६७ शस्त्रक्रिया झाल्या. सन २०१२-१३ या वर्षात ९१६७ शस्त्रक्रिया झाल्या. सन २०१३-१४ या वर्षात ८८३१ शस्त्रक्रिया झाल्या. सन २०१४-१५ या वर्षात ८७०० शस्त्रक्रिया झाल्या. सन २०१५-१६ या वर्षात ७७९४ शस्त्रक्रिया म्हणजे ८५ टक्के झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिष कळमकर यांनी सागितले.

शस्त्रक्रिया कुठेही करता येते -डिएचओ कळमकर
छत्तीसगड राज्यातील महिलांना गोंदिया जिल्हयतील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून त्यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येत आहे याबाबत विचारणा केली असता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिष कळमकर म्हणाले की या जिल्ह्यातील मुलगी जेव्हा लग्न होऊन दुसया जिल्ह्यात किवा राज्यात जाते आणि प्रसुतीसाठी जेव्हा माहेरी येते तेव्हा करता येते.त्यानंतरही कुणी शस्त्रक्रिया करायला येत असेल तर करता येते कारण कुटुंब नियोजन श्सत्रकिय्रा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. पण छ्त्तीसगड राज्यातील राजनादांगाव जिल्ह्यातील महिलांना आणून त्यांच्यावर आमगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचे या भागात कुठलेही नातेवाईक नसताना आणि ज्या आरोग्य सेविकेच्या नावावर ती शस्त्रक्रिया नोंदविली जाते त्यांचाशी कुठलीही ओळख नसताना कशाप्रकारे हे होते हे विचारले असता मात्र ते काही बोलले नाही.

तुम्हाला ज्यांनी सांगितले त्यांनाच विचारा किती शस्त्रकियाचे रुग्ण आणले -तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.ंचदू वंजारे
तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात छत्तीसगड राज्यातील महिलांवर कुुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्यासंदर्भात आमगाव सालेकसा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदू वंजारे यांना विचारणा केली असता तुम्हाला ज्यांनी माहिती दिली आणि सांगितले त्यांनाचा तुम्ही विचारा की त्यांना किती कुटुंबनियोजनाच्या केसेसे आणल्या.आणि ते मुख्यालयी राहतात का असे सांगत कुठलीही महिला पुरुष असो शस्त्रक्रिया कुठेही करता येते यात काही गैरनाही असे सांगितले.

गोंदिया जिल्ह्यातील कुटुंबनियोजनाचा आकडा पुर्ण करण्यासाठी छत्तीसगड येथून केसेस आणून देण्याचे काम करणारी दलालाची टोळीच तयार झाली असून ज्या डॉक्टर qकवा आरोग्य सेविकेला लागत असेल त्यांच्याकडून ३ ते ४ हजार रुपये घेत असल्याची चर्चा आहे.त्यातच जो डॉक्टर शस्त्रकिया करतो तो सुध्दा बाहेरचे केसेसे सांगत ज्यांच्या नावे ती केस चढणार असते त्यांच्याकडून पैसे घेत असल्याची चर्चा होती.