लोकसभेत भूसंपादन विधेयक मंजूर

0
14

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – दोन दिवसाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रणित केंद्र सरकारने मांडलेले बहुचर्चित भूसंपादन विधेयक नऊ सुधारणांसह अखेर आज (मंगळवार) लोकसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकासाठी घेण्यात आलेल्या मतदानाच्या वेळी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेससह, तेलंगणा राष्ट्र समितीच्या सदस्यांनी सभात्याग केला.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील मित्रपक्षांनीही या विधेयकाला विरोध दर्शविला होता. दरम्यान विधेयक मंजूर करताना त्यात नऊ सुधारणा स्वीकारल्या गेल्या आहेत. शिवसेनेने मात्र या विधेयकावर तटस्थ भूमिका घेतली आहे. या विधेयकाच्या वेळी तेलंगणा राष्ट्र समितीच्या सदस्यांनीही सभात्याग केला. विरोधकांनी शेतकऱ्यांची जमिन ताब्यात घेताना शेतकऱ्यांची परवानगी अनिवार्य करण्याची मागणी केली. हे विधेयक राज्यसभेत ठेवल्यानंतर सरकारची खरी कसोटी लागणार आहे.