आज रेल्वेच्या समस्या मांडणार सदस्य बैठकीत

0
12

गोंदिया दि. १२: दक्षिण-पूर्व-मध्य नागपूर मंडळ रेल्वे ग्राहक सल्लागार समितीची सभा १२ ऑगस्ट रोजी नागपूर येथे होणार आहे. सदर सभेसाटी रेल्वे ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य गोकुल कटरे ,निलम हलमारे यांनी गोंदिया स्थानकावर सोयी-सुविधांशी संबंधित सल्ला दिला आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार, गोंदिया स्थानकात गाडी (२२८६५/२२८६६) एलटीटी-पूरी सुपरफास्ट एक्सप्रेसचा थांबा द्यावा. प्रतीक्षा सूचीत असणार्‍या प्रवाशांसाठी बिलासपूर स्थानकाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेची सुविधा असावी. गोंदिया स्थानकावर नागपूरकडील दिशेच्या वरील पायदड पुलावर ट्रेन इंडीकेटर बोर्डची गरज आहे. त्यामुळे पाल चौक व कुडवाकडून येणार्‍या प्रवाशांना गाड्यांची माहिती मिळू शकेल. गोंदिया स्थानकाच्या प्लॅटफॉर्म-२ मध्ये ट्रकला वाशेबल करण्याची गरज आहे. त्यामुळे घाणीपासून सुटका होईल. विश्रामालयाची बुकींग प्लॅटफॉर्म-१ वरून केली जाते. मात्र विश्रामालय प्लॅटफॉर्म-३ व ४ वर आहे. त्यामुळे रात्री बाहेरून येणार्‍या प्रवाशांना त्रास होतो. त्यासाठी विश्रामालयाची बुकींग प्लॅटफॉर्म-३ व ४ वरून करण्यात यावी. किंवा विश्रामालय प्लॅटफॉर्म-१ व आणण्याची सोय करावी.सेवाग्राम गोंदियापर्यंत वाढविणे,तिरोडा येथे विदर्भला थांबा देणे.हिरडामाली येथे मालधक्का हलविणे.
अमरावती-नागपूर इंटरसिटी एक्सप्रेसला गोंदियापर्यंत विस्तारित करण्याची नागरिकांची मागणी आहे.तसेच जेव्हापासून भीमनगर व र्मुी येथे गोंदिया दक्षिण रेल्वे गेटची स्थापना झाली आहे, तेव्हापासून आजपर्यंत या दोन्ही ठिकाणी शौचालयांची सोय नाही. ती सोय करण्यात यावी. आमगाव रेल्वे स्थानकावरून दरदिवशी हजारो प्रवाशी तसेच मासिक पासधारक विविध ठिकाणी प्रवास करतात. परंतु गैरसोयीमुळे ते त्रस्त झाले आहेत. प्लॅटफॉर्म-२ वर मुंबईकडे जाणार्‍या गाड्या थांबतात. परंतु या प्लॅटफॉर्मवर इंजिनच्या दिशेने शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्ह व पावसात उभे राहून गाड्यांची वाट पहावी लागते. स्थानकावर मालगाड्यांच्या सुरक्षेसाठी योग्य सोय नाही. स्थानकावर बनलेल्या प्रवाशी शेडमध्ये पंखे आहेत, परंतु ते बंद स्थितीत आहेत.
प्रवाशांची मोठी संख्या बघता बुकींग ऑफिसमध्ये कमीत कमी तीन खिडक्यांची गरज आहे. गाड्यांच्या बोगींच्या स्थितींचे विवरण देण्यासाठी डिस्प्लेची अत्यंत गरज आहे तसेच प्लॅटफॉर्म-१/२ वर पर्याप्त प्रकाशाची व्यवस्था करण्यात यावी.
गोंदिया-बल्लारशाह मार्गावरील हिरडामाली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर कुलर, तिकीट काऊंटरच्या समोर शेड असणे गरजेचे आहे. त्यामुळे उन्ह व पावसापासून प्रवाशांचे रक्षण होवू शकेल. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने स्टॉफ क्वॉर्टर व रेल्वे परिसरात आवारभिंत असणे अत्यंत आवश्यक आहे.या सर्व समस्यांचे निराकरण रेल्वे प्रशासनाने करावे, अशी मागणी रेल्वे ग्राहक सल्लागार समितीचे केली आहे.