जैन समाजाने काढला मोर्चा,मुख्यमंत्र्याना पाठविले निवेदन

0
9

गोंदिया दि.२४: जैन समाजातील संथारा/संल्लेखना या धार्मिक प्रथेच्या समर्थनार्थ जैन समाजाच्यावतीने आज सोमवारी (दि.२४) मूक मोर्चा काढून समाजाच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या नावे उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव यांना निवेदन सादर करण्यात आले.त्या आधी गोंदिया शहरातील मुख्य बाजारपेठेच्या मार्गाने मुक मोर्चा काढून राजस्थान न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला.उपविभागीय कार्यालयासमोर येताच मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले.यावेळी आमदार राजेंद्र जैन,सीए विनोद जैन,राजू एन.जैन,प्रकाश कोठारी,सुकमल जैन,डाॅ.विजय पारेख,डाॅ.नविन शहा,तिलकचंद जैन,अशोक ठाल्या,तरुण अजमेरा,पवन जैन,वसंत जैन,प्रदिप जैन,सुनिता जैन यांच्यासह मो्ठ्यासंख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.यावेळी सदर निर्णय मागे घेण्यात यावे व जैन धर्मियांच्या भावनांचा आदर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
राजस्थान उच्च न्यायालयाने जैन समाजातील संथारा या धार्मिक प्रथेला आत्महत्या निश्चीत करून दंडनीय अपराध म्हटले आहे. याचा विरोध करण्यासाठी जैन समाजाच्यावतीने या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यांतर्गत गोंदियात सकाळी ११.३० वाजता गोरेलाल चौक स्थित जैन मंदिरातून हा मूक मोर्चा श्री टाॅकीज,गोरेलाल चौक,गांधी प्रतिमा,अग्रेसन गेट,जयस्तंभ चौक मार्ग नेहरु चौक स्थित उपविभागीय कार्यालयासमोर पोचला. गोंदियासह ,देवरी,गोरेगाव,तिरोडा,आमगाव येथेही जैन समाजाच्यावतीने प्रतिष्ठान बंद ठेवून सदर निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आली.