भंडारा येथे होणार १0 जिल्ह्यांसाठी होणार सैन्य भरती

0
17

भंडारा दि. २८: विदर्भातील १0 जिल्ह्यांसाठी भारतीय सैन्य दलाने ६ ते १७ जानेवारी २0१६ दरम्यान सैन्य भरती रॅली आयोजित करण्याचे निश्‍चित केले आहे. या रॅलीसाठी भंडारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व विभागांच्या सहकार्याने नियोजन करुन सैन्य भरती रॅली यशस्वी करण्यात येईल, अशी हमी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सैन्य भरती संदर्भात नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार चरण वाघमारे, सेना भरती कार्यालयाचे नागपूर विभागाचे भरती संचालक कर्नल महेंद्रकुमार जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे उपस्थित होते. ही रॅली विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या दहा जिल्ह्यांसाठी भंडारा शहरात छत्नपती शिवाजी जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे. सैन्य भरतीसाठी नेहमी खुली रॅली आयोजित करण्यात येत असते. मात्न यावेळी पहिल्यांदाच ऑनलाईन नोंदणी उमेदवारांना करावी लागणार आहे. संकेतस्थळावर उमेदवारांना रॅलीच्या ४५ दिवसअगोदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल.
जिल्ह्यात या रॅलीच्या आयोजनासंबंधी नियोजन करतांना मोठया प्रमाणात येणार्‍या उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन नियोजन करावे लागेल. उमेदवारांना राहण्यासाठी मंगल कार्यालय, शाळा आणि जिल्हा क्रिडा संकुल येथे व्यवस्था करण्यात यावी. तसेच उमेदवारांना येण्या-जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त बसेस सोडाव्यात आणि रेल्वे विभागाने भंडार्‍याकडे येणार्‍या रेल्वे गाडयांना अतिरिक्त बोगी द्यावी, अशी मागणी संबंधितांना करण्यात येणार आहे.

भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. यामध्ये दिलेल्या पात्नतेनुसार उमेदवारांची निवड करुन त्यांना प्रवेशपत्न ई-मेलद्वारे पाठविण्यात येईल. यासाठी उमेदवारांचा ई-मेल आय.डी. आणि भ्रमणध्वनी क्रमांक ऑनलाईन नोंदणी करतांना देणे आवश्यक आहे. उमेदवारांची १.६ किलोमीटर धावण्याची परिक्षा घेण्यात येईल. यात उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांचे बायोमेट्रीक रजिस्ट्रेशन करण्यात येईल. त्यानंतर शारिरिक चाचणी उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल.
■ वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय सेना दलात प्रवेश मिळेल. यासाठी उमेदवारांनी आतापासून तयारी करावी, असे आवाहन कर्नल महेंद्रकुमार जोशी यांनी केले आहे.
■ त्याचबरोबर यामध्ये उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणार असून यामध्ये गैर मार्गाला कुठलाही वाव मिळणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्‍वास ठेवून सैन्य भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे. उमेदवार ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्वत: संगणकावर, सेतु केंद्र तसेच कुठल्याही सायबर कॅफेमध्ये जावून करु शकतील. राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक प्राप्त खेळाडू तसेच एन.सी.सी.मध्ये सी प्रमाणपत्न प्राप्त उमेदवारांसाठी आरक्षण राहणार आहे. अशी माहिती कर्नल महेंद्रकुमार जोशी यांनी दिली.