अंगणवाड्यात निकृष्ट खाऊ पुरविणाèयाला काळ्या यादीत घाला

0
8

जि.प.सदस्य पंधरे यांंची महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत मागणी

महेश मेश्राम
आमगाव,दि३०- तालुक्यातील अंजोरा जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत येत असलेल्या तिगाव परिसरातील अंगणवाड्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मुलांसह गरोदर मातांना निकृष्ट दर्जाच्या पोषण आहार दिला जात आहे. हा निकृष्ट दर्जाचा पुरविण्यात येत असल्याने आहार त्वरित जप्त करून पुरवठादाराला काळ्या यादीत घालण्याची मागणी अंजोरा क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे यांनी महिला बालकल्याण समितीच्या पहिल्याच सभेत करून महिला बालकल्याण सभापतींसह अधिकाèयांना धारेवर धरले.विशेष म्हणजे शिलाई मशीन आणि सायकलींच्या विषयावर चर्चा करून सभा आटोपती घेत असतानाच पंधरे यांनी आपला विभाग फक्त शिलाई मशीन आणि सायकलकरिताच आहे काय अशा प्रश्न उपस्थित करून आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील अंगण‹ावाड्यातून देण्यात येणाèया पोषण आहाराची पुराव्यासह माहिती दिली.कुणीही अंगणवाडीतील मुलगा हा पोषण आहार खात असून ज्या गरोदर मातांना सुध्दा दिला जातो ते सुध्दा तो पोषण आहार आपल्या जनावरांना देत असल्याचे जि.प.सदस्य पंधरे यांनी आपण लाभार्थी गरोदर मातांच्या घरी भेट दिल्यानंतर हे चित्र बघावयास मिळाल्याचे बैठकीत सांगितले.त्यानंतर महिला बालकल्याण सभापती विमल नागपूरे यांनी सदर विषयाची नोंद करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा परिषद सदस्य पंधरे यांनी दिलेल्या माहितीनुसार कटगंटोला,कव‹ळी,वळद,पानगाव,रामपूर,गंगूटोला,कन्हारटोला,रामाटोला,अंजोरा,हलबीटोला आदी अंगणवाड्याना भेट दिल्यावर तेथील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी अशाप्रकारचा निकृष्ट पोषण आहार येत असून याची माहिती वरिष्ठांना तोंडी दिल्याचेही सांगितले.परंतु अंगण‹वाडी सुपरवायझर आणि तालुकास्तरावरील महिला बालविकास अधिकारी यांनी जाणीवपूर्वक हा विषय जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाèयांच्या लक्षात आणून दिला नसल्याचे सांगितले.तसेच सदर पोषण आहार,खाऊचा पंचनामा करून तो जप्त करण्यात यावा.सदर खाऊ व पोषण आहाराचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावे.तसेच निकृष्ट खाऊ अंग‹णवाड्यांना पुरवठा करण्यात आल्याने या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तत्काल तक्रार देऊन खाऊ व पोषण आहार पुरविणाèया एंजसीला कायमचे बंद करून जिल्हापरिषदेच्या काळ्या यादीत घालण्यात यावे.सोबतच या पुरवठ्यामध्ये जे अधिकारी,कर्मचारी व इतर कुणी गुंतले असतील त्यांचीही चौकशी करण्याची मागणी जि.प.सदस्य पंधरे यांनी केली आहे.