नितु पशिने हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा द्या

0
13

अर्जुनी मोरगाव,दि.१-येथील बहुचर्चित नितू पशिने हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी व अशा घटनांनावर आळा घालण्यात यावे, या मागणीसाठी स्थानिक व्यापारी असोसिएशन व तालुका काँग्रेस कमेटी तथा सर्वपक्षीय मोच्र्याचे आयोजन (दि.१) करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन नायब तहसीलदार ए.एस. पाटील यांना देण्यात आले.
स्थानिक व्यापारी सुरेश पशिने यांची पत्नी नितू पशिने यांची ९ जुलै रोजी त्यांचे राहते घरी भरदुपारी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे संपूर्ण अर्जुनी मोर शहर दशहतीत होता. अखेर ४८ दिवसानंतर दोन आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. आरोपींना ३१ ऑगस्टला न्यायालयात हजर करण्यात आले व पुन्हा ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मागितली आहे. यावेळी व्यापारी संघटनेचे लूनकरच चितलांगे, नामदेव कापगते, जि.प. सदस्य गिरीष पालीवाल, संजय जायस्वाल, मुकेश जायस्वाल, उपसभापती अशा झिलपे, किशोर शहारे, सर्वेश भुतडा, नवीन नशीने, चंद्रशेखर ठवरे, श्याम शहारे, राजू पालीवाल, इंद्रदास झिलपे, मुन्ना शुक्ला, माणिक घनाडे, सुरेश पशिने, अग्रवाल, नाना शहारे, अरqवद पालिवाल, अजय पशिने व शेकडो व्यापारी पदाधिकारी उपस्थित होते.