देवरी उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक

0
7

देवरी दि. १३:- यंदाच्या दुष्काळी परिस्थितीला घेऊन तालुक्यातील शेतकèयांनी गेल्या बुधवारी (दि.९) उपविभागीय कार्यालयावर मोच्र्याचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने काल शुक्रवारी (दि.११) उपविभागीय कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवरीचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी हे होते. यावेळी तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी शालिकराम मेश्राम, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगळे हे उपस्थित होते. या बैठकीला जि.प. सदस्य दीपकसिंह पवार, उषा शहारे, पं.स. सदस्य महेंद्र मेश्राम, राजेश चांदेवार, तालुक्यातील सरपंच संघटनेचे पदाधिकारी जितेंद्र रहांगडाले आणि इतर सरपंच, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने हजर होते.
या बैठकीत बोलताना उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी या भागातील दुष्काळी परिस्थितीबाबत शासनाला कळविले असल्याचे सांगितले. याशिवाय तालुक्यातील नुकसानीचे सव्र्हेक्षण कृषी विभाग, महसूल विभाग व पंचायत समितीच्या कर्मचाèयांच्या माध्यमातून करून तसा अहवालसुद्धा शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे श्री सूर्यवंशी यांनी उपस्थितांना सांगितले. या शिवाय पीकविमा संदर्भातही पदाधिकाèयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तालुका कृषी अधिकारी कोटांगळे यांनी उत्तर दिले. याबैठकीत शेतकèयांसह शासकीय योजनांच्या आर्थिक देवाणघेवाण संदर्भात स्थानिक भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी हे सभ्य वर्तणूक देत नसल्याचा आरोप करीत ग्राहकांना नाहक त्रास देत असल्याची बाब समोर आली. उपविभागीय अधिकारी यांनी उपस्थित असलेले बँकेचे अधिकारी यांनी यापुढे अशा तक्रारी येणार नाही, याविषयी काळजी घेण्याचे निर्देश दिले.