रेशनकार्डला आधार जोडण्यात गोंदिया जिल्हा राज्यात आघाडीवर-जिल्हा पुरवठा अधिकारी काळे

0
15

गोंदिया,दि.२२- रास्तभाव धान्य दुकानामध्ये पोहोचणाèया धान्य व रॉकेल वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. त्यासंदर्भातील अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे अशा भ्रष्ट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वखार महामंडळातून बाहेर पडलेल्या प्रत्येक वाहनाला जीपीएस (ग्लोबल पोझिशन सिस्टीम) प्रणालीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याने निर्णयाबरोबर विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जीपीएस प्रणालीमुळे काळाबाजारात होणाèया पुरवठ्यावर आळा बसण्यास मदत होणार आहे.त्याचप्रमाणे रेशनकार्डधारकांच्या आधारची जोडणी रेशनदुकानदाराकडे असलेल्या बायोमॅट्रीक प्रणालीला जोडण्यात येणार असल्याने बोगस रेशनधारकांच्या नावावर होणाèया अऩ्यधान्याच्या उचलावर सुध्दा आळा बसणार आहे.गोंदिया जिल्ह्याने ६० टक्के आधारनोंदणी रेशनकार्डला करून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.त्यापाठोपाठ लातूर,नंदुरबार,qसधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्याचा क्रमांक लागला आहे.गोंदिया जिल्ह्यातील ९ लाख ३५ हजार ७५४ रेशन लाभाथ्र्यांपैकी ५ लाख ६६ हजार ५३५ लाभाथ्र्यांच्या आधारकार्डची नोंदणी १८ सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये प्रतिसाद चांगला मिळाला असून गोंदिया शहरातील ४ लाख लाभाथ्यापैकी फक्त दीड लाख लाभाथ्र्यांच्याच आधारकार्डची नोंदणी आत्तापर्यंत होऊ शकली आहे.गोंदिया शहरातील नागरिकांनी आपल्या आधारकार्डची नोंदणी रेशनस्वस्तधान्य दुकानदाराकडे असलेल्या अर्जामध्ये तातडीने करून देण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी केले आहे.ज्यांच्या आधारकार्डची नोंदणी रेशनकार्डला होणार नाही,त्यांना भविष्यात रे़शनचा धान्य मिळण्यास अडचण निर्माण होणार असल्याचेही काळे यांनी सांगितले.जेवढ्या रेशनकार्डला आधारकार्डची नोंदणी असेल तेवढ्याच धान्याला मंजुरी सुध्दा देण्यात येणार आहे.येत्या डिसेंबरपर्यंत उर्वरित रेशनकार्डला आधारकार्डची नोंदणी करून बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे धान्याचे वितरण करण्यासाठी आपला जिल्हा पुर्णत तयार राहणार असल्याचा विश्वास सुध्दा काळे यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात रेशन धान्य दुकान संख्या-१,०१३ व रेशन कार्डधारक-२ लाख ८१ हजार १६९ एवढे असले तरी लाभार्थी संख्या ही अधिक आहे.गोंदिया शहर मोठे असल्याने याठिकाणी पाहिजे त्याप्रमाणात प्रतिसाद मिळालेला नाही.नागरिकांनी आपल्या रेशनधान्य दुकानदाराला पुरवठा विभागाने दिलेले फार्म मागून आपली माहिती त्वरित सादर करावे असेही जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी म्हटले आहे.