देवरीत ओबीसी क्रांती संघटनेची स्थापना

0
9

देवरी दि.६ -स्थानीय धुकेश्वरी माता मंदिरात आयोजित बैठकीत ओबीसी युवा क्रांती संघटनेची स्थापना करण्यात आली.सुदर्शन लांडेकर, प्रफुल्ल खेडीकर, विजय डहाके, राजेश भाजीपाले यांनी पुढाकार घेत ओबीसी समाजावर होणारा अन्याय आणि आरक्षणावर समाजात जागृती करण्यासाठी संघटना स्थापन केली. त्यात सुदर्शन लांडेकर यांनी प्रास्ताविक मध्ये ओबीसी समाजाला आता जागृत करण्यासाठी लोक समाजाची दिशाभूल करीत आहेत असे सांगितले. तर ओबीसी समाज हा आपसा-आपसातच झगडून स्वय:चा नुकसान करीत आहे. असे प्रतिपादन प्रफुल खेडीकर यांनी मांडले. ओबीसी समाजाचा इतिहास नंदकिशोर बारसे यांनी सांगितला. या बैठकीला प्रामुख्याने सुदर्शन लांडेकर, दुर्गाप्रसाद बडगे, दुर्गेश्वर बागडे, खेमराज मेंढे, राकेश चांदेवार, योगेश्वर मेंढे, संजय हत्तीमारे, राजेश भाजीपाले, नंदकिशोर बारसे, मुकेश qझगरे, खुशाल लेंडे, मारोती गायकवाड, मुकेश कावळे, राजकुमार बारसे, मुकुंदराज शेंडे, किशोर गायधने, पुरुषोत्तम रहिले, प्रफुल्ल खेडीकर, मधुकर मांदाडे, महेंद्र रहिले, मुकेश चौधरी, चंद्रशेखर राने, विजय डहाके, उत्कर्ष लांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.