उपजिल्हाधिकाèयांचा आदेशाला एनजीओचा ठेंगा

0
10

गोरेगाव,दि. ६ -: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोरेगाव पंचायत समिती कार्यालयात डाटा एन्ट्री पदावर कार्यरत गणेशकुमार टेकेश्वर मेश्रामला मातोश्री बहुउद्देशीय शिक्षण संस्था आमगाव कडून वरिष्ठांना कुठलीही माहिती न देता कामावरून कमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी पदावर नियुक्ती करण्याचा अधिकार संंबंधित एनजीओला होता. परंतू, कोणत्याही कंत्राटी नियुक्ती पूर्वी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांना माहिती दिल्याशिवाय भर्ती करता येत नाही qकवा कमी करण्याचा ही अधिकार एनजीओला नसून उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांना आहे. या प्रकरणात गणेशकुमार टेकेश्वर बोपचे पंचायत समिती येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी स्वरूपात मागील ६ महिण्यापासून डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. परंतू, मातोश्री बहुउद्देशीय शिक्षण संस्था आमगाव ने सदर कर्मचाèयाला अतिरिक्त ठरवून कामापासून कमी केले व त्याच्या ऐवजी तहसील कार्यालय गोरेगाव मगांराग्रारोह योजनेंतर्गत कंत्राटी स्वरूपात डाटा एन्ट्री ऑपरेटर नंदकिशोर चौधरी यांना देवून त्यांचा जागी कु. संगिता तुरकर यांना म.गां.रा.ग्रा.रो.ह. योजनेंतर्गत कंत्राटी स्वरूपात डाटा एन्ट्री पदावर नियुक्ती केली आहे. कामापासून कमी करण्यात आलेल्या बोपचे यांनी सर्व प्रकार वरिष्ठांना कळविल्याने उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी.शिंदे यांनी संपूर्ण प्रकरणात आदेश काढून मनुष्यबळ पुरविण्याकरीता मागील वर्षात कार्यरत मनुष्यबळास प्राधान्याने कामावर घेण्याचे निर्देश दिले.
सदर पदभर्ती प्रक्रियेत मातोश्री संस्थेने पद कमी करने qकवा नवीन पदभर्ती करण्याचा संदर्भात उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांना कोणत्याही प्रकारची सूचना दिली नाही. तसेच त्यांच्या आदेशाला मान्य न करता मनमर्जीपणाने कार्य केले आहे. या संपूर्ण प्रकरणात उपजिल्हाधिकारी यांनी बोपचे यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत व नवीन नियुक्ती झालेली कु. संगीता तुरकर यांना कोणत्याही परिस्थितीत मानधन न देण्याचे आदेश दिले होते. तरीही त्या आदेशाला सदर संस्थेने ठेंगा दाखिवल्याने चर्चेचा विषय झाला आहे.