दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

0
17

गडचिरोली दि.८: आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह गडचिरोली, अनुदानित आo्रमशाळा कन्हाळगाव व इंदिरा आo्रमशाळा सुकाळा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात वसतिगृहाचे अधीक्षक, कर्मचारी, अनुदानित आo्रमशाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक जबाबदार आहेत. संबंधित दोषींवर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला आविसंचे गडचिरोली अध्यक्ष क्रांती केरामी, देवयत्री टोहलिया, प्रकाश मट्टामी, संदीप वरखडे, रविता नैताम, रोहित वड्डे, मानवाधिकार संघटनेचे गजेंद्र डोमळे आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना उपस्थित पदाधिकार्‍यांनी सांगितले की, गडचिरोलीच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल गीता किन्नाके व तेथील कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे या वसतिगृहाची विद्यार्थिनी प्रगती भजनदास उईके हिचा ४ ऑक्टोबर २0१५ रोजी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. कन्हाळगाव अनुदानित आo्रमशाळेची विद्यार्थिनी छाया कटिया पुंगाटी हीचा २९ सप्टेंबर २0१५ रोजी तेथील कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. तसेच इंदिरा आo्रमशाळा सुकाळाचा विद्यार्थी सुभाष इष्टाम याचा ३ ऑक्टोबर रोजी संस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक व अधीक्षकांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील आo्रमशाळा वसतिगृह बंद पाडू, असा इशारा दिला