आदर्श आमदार गावात जातीय सलोख्यासोबतच लोकसहभागातून करणार विकास-ना.बडोले

0
9

सामाजिक न्यायमंत्री बडोलेंनी घेतले कणेरी(राम)ग्राम दत्तक

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.८- गावाचा विकासासाठी जातीयसलोखा महत्त्वाचा असून गावात विकासाची कामे करतांना लोकसहभाग सुध्दा तेवढाच महत्त्वाचा राहणार असल्याचे स्पष्ट विचार ना.राजकुमार बडोले यांनी ग्रामसभेत मांडले.ग्रामसभेच्या मागणीनुसारच गावाचा विकास केला जाईल.या गावाच्या विकास आराखड्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुख सादर करून एक आदर्श असे गाव तयार करण्यात येणार असल्याचे म्हणाले.गावात १०वी पर्यंत शिक्षणाच्या सोयीसोबतच,qसचन,पशुधनातून शेतकरी समृद्ध करण्याच्या योजना राबविण्यात येतील.तर कौशलवृध्दीच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन रोजगारासाठीही विविध विभागाच्या योजना गावात अमलात आणल्या जाणार असे विचार बडोले यांनी व्यक्त केले. ते आदर्श आमदार ग्राम योजनेतंर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील कणेरी(राम) या गावाला दत्तक घेत पहिल्या ग्रामसभेत गुरुवारी बोलत होते.
विशेष म्हणजे पालकमंत्री अनुत्सुक या मथळ्याखाली सर्वातआधी बेरार टाईम्सने पालकमंत्री आदर्श ग्राम घेण्यात अनुत्सुक असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.त्यानंतरच राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोल यांनी त्या वृत्ताची दखल घेत कणेरी (राम) हे गाव दत्तक घेतले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यंवंशी यांनी गाव आदर्श करण्यासाठी आयोजित या ग्रामसभेतील महिलांची बहुसंख्येने असलेल्या उपस्थितीनेच गावाच्या विकासाची नवी दिशा ठरली आहे.महिलांचा पुढाकार हेच खरे गाव आदर्श करण्याचे खरे गमक असल्याचे विचार व्यक्त केले.आदर्श ग्राम योजनेच्या ग्रामसभेतून विभाग प्रमुखांना जो सत्कार स्वीकारला त्या सत्काराने प्रत्येक अधिकाèयाची जबाबदारी वाढल्याने प्रत्येकांने आपल्या विभागाच्या चांगल्या योजना गावात राबवून एक आदर्श निर्माण करावे असेही म्हणाले.भौतिक,पायाभूत,आर्थिक सुविधांसोबतच सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वात आधी प्लस्टिक बंदीचा निर्णय आपण आजपासून सर्वांनी घेऊ असे आवाहन ग्रामसभेतून केले.
आदर्श गाव कणेरी(राम)च्यावतीने उपसरंपच प्रेमलाल मेंढे यांनी प्रास्तविकातून गावातील समस्यांशी पालकमंत्री व उपस्थित अधिकारी यांचे लक्ष वेधले.संचालन ग्रामसेवक कमलेश बिसेन यांनी केले.
ग्रामसभेला जिल्हा परिषदेचे अति.मुकाअ जयवंत पाळवी,जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, लीड बँक प्रमुख अनिलकुमार श्रीवास्तव,गावच्या सरपंच इंदू मेंढे,जि.प.सदस्य माधुरी पाथोडे,जि.प.सदस्य शिला चव्हाण,वरिष्ठ भूवैज्ञानिक काझी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिष करमळकर,उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे,कार्य.अभियंता पठारे,वसंता गहाणे,लक्ष्मीकांत धानगाये,आदिवासी सहा.प्रकल्प अधिकारी मिनाक्षी उन्हाळे,गटविकास अधिकारी टेंभरे,,उपविभागीय अभियंता कापगते,पाणीपुरवठा उपविभागीय अभियंता चव्हाण,गिरिधर हत्तीमारे,पंचायत समिती उपसभापती शिवणकर,पोलीस पाटील विनोद वाढई,ग्रामसेविका कु.बागडे,तालुका कृषी अधिकारी सुरेश पेशट्टीवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी मंचावर उपस्थित होते.

गावातील समस्या व आवश्यक असणाèया गरजा
स्मशानभूमीकडे जायला रस्ता नाही.पाणी योजना व्यवस्थित नसल्याने पाणी टंचाई.ढोरबोडीकडे जाण्यासाठी रस्ता नाही.कोकणा ते कणेरी हा रस्ता अर्धवट असल्याने शेतकèयांना त्रास.गावात १० वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय हवी.वनहक्काचे पट्टे न मिळाल्याने शेतीसाठी अडचण.ग्रामपंचायतच्या सभेकरिता प्रसस्त सभागृह.संतोषी मंदिराजवळ प्रतिक्षालय व सभामंडप.जि.प.प्राथमिक शाळेच्या आवारात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी रंगमंच.सामूहिक विवाह मंगलकार्यालय.मिनी अंगणवाडीचे बांधकाम,प्रवासी निवारा.गावात वाचनालय आणि परीक्षा मार्गदर्शन केंद्राची व्यवस्था.
दहा गाळ्याचे व्यापार संकुल.बाजार ओटे बांधकाम.बंधारा तयार करून लिफ्टद्वारे तलावाचे पाणी qसचनासाठी देण्याची सोय.

असे आहे कणेरी/राम
पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी त्यांच्या मतदारसंघातील सडक अर्जुनी या तालुक्यातील सहा किलोमीटर अंतरावर असलेले कणेरी/राम हे गांव आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे. दत्तक गावाचा सर्वागीण विकास करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन कणेरीत पालकमंत्र्याच्या उपस्थितीत करण्यात आले. कणेरीतील लोकसंख्या १२०८ असून पुरुष ५७४ व महिला ६३४ आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण गावात जास्त आहे. गावात ३५२ कुंटूंब असून १८१ कुंटूंब दारिद्रयरेषेच्या वर तर १७१ कुंटूंब दारिद्रयरेषेच्या खाली आहे. अनुसूचित जातीच्या कुंटूंबाची संख्या ४४ तर ढिवर समाजाची कुंटूंब संख्या ३१ इतकी आहे. गावाचे वनजमीन क्षेत्र २५५.७८ हेक्टर तर पिकाखालील क्षेत्र ४९०.६८ हेक्टर इतके आहे. १४ कुंटूंबे बायोगॅसचा वापर करतात. सार्वजनिक शौचालयाची संख्या ५ असून वैयक्तिक शौचालये ३०१ आहेत. कणेरीत २६० शेतकरी कुंटूंब वास्तव्यास असून भूमिहीनाची संख्या २० आहे.