इंगळे चौक दुर्गा उत्सव समितीतर्फे २१०० मुलींना कन्या भोजन

0
13

गोंदिया,दि..२१: शहरातील इंगळे चौक परिसरातील इंगळे चौक दुर्गा उत्सव समितीच्या वतीने २० ऑक्टोबर रोजी नवकन्या भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील २१०० लहान मुलींना नवकन्या भोजन देण्यात आले.
येथील इंगळे चौकातील सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीतर्फे गोंदियाची महाराणी माता दुर्गापुजेचे उत्सव दरवर्षी लोक उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दरम्यान उत्सव समितीतर्फे आपल्या विविध उपक्रमात महिलांचे कार्यक्रम, लहान विद्याथ्र्यांचे कार्यक्रम, जबलपुरच्या निष्पणात ऑकेस्ट्राचा कार्यक्रम तसेच गोंदियातील प्रसिद्ध खप्पर नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ९ दिवस महाप्रसादाचे आयोजन ही केले जाते. दुर्गा उत्सव समितीच्यावतीने दुर्गा पुजेच्या निमित्त कन्या भोजन दिले गेले. यात २१०० मुलींना कन्या भोजन देऊन त्यांना बक्षीस ही देण्यात आले.