अर्जुनी मोर व नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात सुविधा द्या – जि. प. सदस्य तरोणे

0
11

अर्जुनी मोरगाव दि.21-जिल्ह्यातील टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालय व नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयात सोयी सुविधा देऊन रुग्ण्याणांची होणारी हेळसांड थांबविण्यात यावी अशी मागणी नवेगावबांध जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य किशोर तरोणे यांच्यासह तालुक्यातील इतर जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना सोमवारी दिलेल्या निवेदनात केली आहे.
अर्जुनी मोर तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून तालुक्यात विकासाच्या नावावर काहीही नाही. तर आरोग्याच्या दृष्टीने तालुक्यात अर्जुनी – मोर व नवेगावबांध या दोन ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची निर्मीती करण्यात आली आहे. मात्र अपेक्षित अशी सुविधा अद्यापही पुरविण्यात आली नाही. परिणामी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो. दरम्यान जि. प. सदस्य किशोर तरोणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते यांची भेट घेऊन दोन्ही रुग्णालयातील समस्यांविषयी माहिती दिली. दोन्ही रुग्णालयात अपेक्षित सोयी सुविधा देण्यात याव्यात यासाठी निवेदन सादर केले. सादर निवेदनानुसार ग्रामीण रुग्णालयात नियमीत स्वच्छता करणे, कर्मचाèयांचे रिक्त भदे भरणे, प्रसुतीगृहात शस्त्रक्रिया गृह / वातानुकूलित यंत्र लावणे, रुग्णालय परिसरातील पटांगणाचे सपाटीकरण करून परिसरात फुलबाग तयार करणे, रुग्णालयाच्या इमारतीची देखभाल, दुरूस्ती करणे, पिण्याच्या पाण्याचे जलशुध्दीकरण व शितकरण यंत्र लावणे, रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी प्रतिक्षागृहाची निर्मीती करणे, व रुग्णालयात नियमीत स्वच्छता कर्मचाèयाची नेमणूक करणे आदी मागण्याचे समावेश करण्यात आले होते. निवेदन सादर करतेवेळी जि. प. सदस्य तेजुकला गहाणे, मंदा कुंभरे व तालुक्यातील इतर जि. प. सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.