नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची सोडत ९ नोव्हेंबरला मुंबईत

0
12

गोंदिया दि, ६ : तालुका मुख्यालयाी नवनिर्मित नगर परिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबई येथे नगरविकास मंत्रालयात ९ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे.राज्यातील नवनिर्मित बहुतांश नगर परिषदा व नगरपंचायतींची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी पार पडली.मात्र गडचिरोली जिल्हयात ही निवडणूक दोन टप्प्यांत घेण्यात आली. या जिल्हयातील नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल ७ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या सर्व नगर परिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची सोडत ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुंबई येथील नगरविकास मंत्र्यांच्या दालनात काढण्यात येणार आहे. यासाठी नगर परिषद प्रशासनाचे सहायक संचालक, जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी वा प्रशासक तसेच संबंधित विभागातील १० लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगरविकास विभागाने केले आहे. ९ नोव्हेंबरपासूनच दिपावलीस सुरुवात होणार आहे. अशावेळी नगराध्यक्षपदाची सोडत काढण्याचे ठरविल्याबाबत लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.