नवनिर्मित १०० नगरपरिषदा, पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर

0
22

अर्जुनी- अनु.जाती महिला,देवरी नामाप्र महिला,गोरेगाव व सालेकसा महिला ओपन तर सडक अर्जुनी खुल्या गटासाठी

गोंदिया दि, ९-शासनाने नव्याने स्थापन केलेल्या १०० नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या राखीव प्रवर्गाची आरक्षण सोडत आज मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली.

राज्यात पूर्वीच्या असलेल्या २३९ व नव्याने स्थापन झालेल्या १०० नगरपरिषदा व पंचायती अशा एकूण ३३९ नगरपरिषदा व पंचायतींपैकी त्या त्या प्रवर्गाच्या एकूण लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी ४४, अनुसूचित जमातीसाठी १६, नागरिकांचा मागास प्रवर्ग ९२ आणि खुल्या प्रवर्गासाठी १८७ जागांचे आरक्षण आहे.
नव्याने निर्मिती झालेल्या १०० नगरपरिषदा व पंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी १३, अनुसूचित जमातीसाठी ६, नागरिकांचा मागास प्रवर्ग २७ आणि खुल्या प्रवर्गासाठी ५४ जागांचे आरक्षण आहे. या आरक्षणातील ५० टक्के पदे ही महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यांची सोडत आज काढण्यात आली.

गडचिरोली जिल्हयातील धानोरा व अहेरी या दोन नगरपंचायतींचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. चामोर्शी व एटापल्ली या दोन नगरपंचायतींचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. कुरखेडा, कोरची व सिरोंचा या तीन नगरपंचायतींमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील(खुला) व्यक्तीला नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भामरागड(अनुसूचित जमाती सर्वसाधारण) व मुलचेरा(अनुसूचित जमाती सर्वसाधारण) असे आरक्षण जाहीर झाले आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव १३ नगरपंचायतीपैकी तिवसा, माळशिरस, अर्जूनी, सावली, लाखांदूर व नायगांव या ६ नगरपरिषदा महिला प्रवर्गासाठी तर अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ६ नगरपंचायतीपैकी धडगांव वडफाळया, सुरगाणा, झरी झामणी या ३ नगरपालिका महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.
नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी अहेरी, फुलंब्री, शिरुर कासार (बीड), पारनेर, वाशी, औंढा नागनाथ, मोहोळ, देवरी, जळकोट, अक्कलकुवा, कसई दोडामार्ग, म्हसाळा, कुही, देवणी, राळेगाव, बाभुळगांव, शहापूर, गोंड पिंपरी, दिंडोरी, धानोरा, लाखनी, मोहाडी, संग्रामपूर, साक्री, लोणंद, लोहार बु. वडवणी या २७ नगरपरिषदा राखीव झाल्या आहे. त्यापैकी अहेरी, पारनेर, वाशी, देवरी,  देवणी, बाभुळगांव, शहापूर,  धानोरा, लाखनी, मोहाडी, साक्री, लोहार बु., वडवणी या १३ नगरपरिषदा महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.
खुल्या प्रवर्गातील ५४ नगरपरिषदांपैकी हिंगणा, देवळा, शिरुर अनंतपाळ (लातूर), मोताळा, जाफ्राबाद, भातकुळी, पाटोदा, घनसावंगी, चामोर्शी, मानोरा, तळा, जामखेड, बार्शी टाकळी, मारेगाव, कारंजा (वर्धा), बदनापूर, चाकण, गोरेगाव, मंडणगड, कळवण, एटापल्ली, खालापूर, पोलादपूर, धारणी, चिमूर, मंठा, कोरपना, सालेकसा या २८ नगरपरीषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर उर्वरित २८ नगरपरीषदा या खुला प्रवर्गासाठी आहेत.