फटाक्याचा आगीने यवतमाळात ‘एसटी’ जळाली

0
5

विशेष प्रतिनिधी

यवतमाळ,दि.12- एसटी आगारातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन बसला फटक्यांचा ठिणगीमुळे आग लागल्याची घटना काल मध्यरात्री दरम्यान घडली, यात दोन्ही बस जळुन खाक झाल्या.फटाक्यांची ठिणगी बसच्या लगत असलेल्या कचर्‍यावर पडल्याने कचऱ्याने पेट घेतला,यावेळी बाजूला उभ्या असलेल्या बसने पेट घेतला ज्यानंतर बाजुला असलेल्या दुसर्‍या बसने देखील पेट घेतला. ही बाब लक्षात येताच लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या दोन बंबानी ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत आगीत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.

परीसरात एकुण ७५ बस होत्या. सुदैवाने यात कुठलीही प्राणहानी झाली नाही. दोन बस जळुन खाक झाल्याने अंदाजे ६० लाखाचे नुकसान झाले आहे .