सर्वाटोला येथे सातबारावर डिजिटल एपव्दारे पिकांची नोंद

0
30

गोरेगाव,ता.२१:-तालुक्यातील झांजिया तलाठी साझा क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या सर्वाटोला येथे ई पिक पाहणी व पिकांच्या पे-याची नोंद डिजिटल एपवर तलाठी अशोक बघेले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी मोबाईलव्दारे शुक्रवारी ( ता.२०) बांध्यावर जावुन केली.
तलाठी अशोक बघेले, कोटवार पुरुषोत्तम रहांगडाले यांनी सर्वाटोला येथिल शेतकरी ओमप्रकाश कटरे,मणीराम पटले, वासुदेव दिवटे,दशरथ बिसेन, महेश चौधरी,दुरेद्र चौधरी यांच्या बांध्यावर जाऊन पिकांची पेरणीची पाहणी केली. व महाराष्ट्र शासनाने कूषी क्षेत्रात डिजीटल क्रांती घडवून आणण्यासाठी मोबाईल एप तयार केला आहे.त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याने ई पिक पाहणी एप व्दारे पिकांची फोटो घेवून नोंद करण्याविषयी माहीती दिली. त्यानुसार या डिजीटल मोबाईल एपची लिंक अपलोड करण्यात आली. शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपपल्या बांध्यावरचे फोटो घेवून पिकांची पेरणी नोंद केली. या नोंदीबरोबर इतर माहीती भरण्यात आल्याने सात बारा वर पेरणीची नोंद झाली. या नोंदीनुसार शेतकऱ्यांना पिक कर्ज,पिक विमा व इतर शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनी स्वताच्या बांध्यावरचे एकुण पेरा यांची नोंद स्वताच मोबाईल एपव्दारे केल्याने अचुक माहितीची नोंद झाल्याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
झांजिया तलाठी साझ्यात दवडीपार,झांजिया या गावातील शेतकऱ्यांची ई पिक पाहणी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती तलाठी बघेले यांनी दिली.
झांजिया,दवडीपार येथील शेतकऱ्यांना मोबाईल डिजिटल एप ची माहिती भरून घेण्यासाठी स्वताचा एंड्राइड मोबाईल किंवा इतर शेतकरी, मित्रमंडळी यांचा मोबाईल वापरावा अशी माहिती देण्यात आली. दवडीपार या गावातील शेतकऱ्यांची ई पिक पाहणी सोमवारी (ता २३) करण्यात येणार आहे.शेतकरी खातेदार व कर्मचारी बांध्यावर जावुन प्रत्यक्ष पिकांची पेरणी पाहणार असल्याने पिकावरील मावा, तुडतुडा,बेरडी,करपा,गाद या सारख्या रोगांची माहिती शेतकऱ्यांबरोबर कर्मचाऱ्यांना होणार आहे. ही माहिती तलाठी मार्फत शासनापर्यंत सहज देता येणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच बरोबर बांध्यावर असलेल्या झाडांची नोंद या मोबाईल एपव्दारे करता येणार आहे. या मोबाईल एप चा वापर करतांना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्यास तलाठी यांच्यासी संपर्क साधावा असे आवाहन तलाठी अशोक बघेले यांनी शेतकऱ्यांना केले आहे.