रेल्वे बुंकीग कार्यालयाच्या शेजारी आग,यंत्रणा बंद

0
25

गोंदिया,दि.16-शहरातील रेलटोली परिसरात आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास  रेल्वे तिकिट बुकींग ऑफिसच्या मागच्या बाजुला लागलेल्या आगीमुुळे रेल्वे बुकीग कार्यालयातील संगणकाचे केबल वायर जळाल्यामुळे बुकींग कार्यालयातील संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली व बुकींग बंद करावी लागली तसेच आगीमुळे दोन ए.सी.जळाले.
रेलटोली साईडच्या बुकींग ऑफिसच्या मागच्या बाजुलाच रेल्वे क्वार्टर्स आहेत व तिथे काही रेल्वे कर्मचारी सहकुटुंब राहतात.या परिसरातील साफ सफाई कडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष नसल्याने बुकींग ऑफिसच्या मागच्या बाजुला मागील अनेक महिन्यापासून केर कचरा पडलेला होता. सध्या दिवाळीचे दिवस असल्याने लहान मुले दिवसभर फटाके फोडण्यात मग्न असतात. या रेल्वे क्वार्टर मध्ये राहणाèया कुटुंबातील एखाद्या लहान मुलाने फटाके फोडायला सुरवात केली असावी व तो फटाका कचèयावर पडल्यामुळे आग लागली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे.
आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारणे केले व बुकींग ऑफिसच्या qभती वरील एसी व केबल वायर जळायला सुरवात झाली.परिसरातील नागरिक तसेच रेल्वे कर्मचाèयांनी लगेच फायर ब्रिगेडला या आगीची माहिती दिली.तसेच आग विझविण्याचे सिलेंडर व पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ३.१० वाजता अग्निशमन दलाची गाडी आली मात्र तो पर्यंत आग आटोक्यात आली होती.याच लाईन मध्ये अनेक निवासी कुटुंबे आहेत. त्यांच्यामुळे या परिसरात अशा आगी लागण्याची शक्यताना नाकारता येत नाही.
रेल्वे स्टेशन अधिक्षक चौधरी यांना विचारले असता आग लागण्याचे नेमके कारण कुठले हे आता सांगता येणार नाही. तसेच या आगीमुळे किती नुकसान झाले ते तपासल्यानंतरच कळेल असे सांगितले. विशेषतः रेल्वे तिकीटांचे आरक्षण प्रामुुख्याने रेलटोली साईटच्या बुकींग ऑफिसमध्ये केले जात असल्याने आगीमुळे आरक्षण बंद झाले आहे.दुसèया साईडला तिकीट देणे सुरू असले तरी सध्या प्रवाश्यांची गर्दी पाहता हे बुकींग ऑफीस बंद असल्याने प्रवाश्याना त्रास सहन करावा लागणार आहे.