वरुडच्या तालुकास्तरीय सर्वचिकित्सालयाचे विधानसभाध्यक्षांच्या हस्ते लोकार्पण

0
12

अमरावती,दि.19-जिल्ह्यातील वरुड येथील तालुका पशुवैद्यकीय लघु सर्वचीकीत्सालयाचे लोकार्पण  महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे  यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.डॉ.अनिल बोंडे होते. प्रमुख उपस्थिती मा.डॉ.सौ.वसुधाताई बोंडे, मा.डॉ.अशोक हजारे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त अमरावती विभाग,वरुडचे नगराध्यक्ष रवींद्र थोरात,व्ही.आर.बनगीनवार अधीक्षक अभियंता उपस्थित होते.यावेळी मा.बागडे  यांचे स्वागत मोर्शी मतदार संघाचे आमदार डॉ.अनिलजी बोंडे यांनी संत्र्याची परडी, मोमेंटो,शाल व श्रीफळ देऊन केले.तसेच एलईडी लाईट वितरण सुद्धा करण्यात आले. पशुमेळाव्याची यावेळी मा.महोदयांनी पाहणी केली.