गडचिरोली जिल्हयाकरीता स्वतंत्रपणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती

0
34

गडचिरोली या समितीचे कामकाजास सुरूवात

 गडचिरोली, दि.11 :  सर्व संबंधीत अर्जदारांना कळविण्यात येते की, दिनांक 1 जून 2016 च्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार दिनांक 21 नोव्हेंबर 2016 पासून तत्कालीन विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. 2, नागपूर विभाग, चंद्रपूर या समितीतून गडचिरोली जिल्हयाकरीता स्वतंत्रपणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली या समितीचे कामकाजास सुरूवात झालेली आहे.

         तत्कालीन विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीक्र. 2, नागपूर विभाग, चंद्रपूर समितीकडे गडचिरोली जिल्हयातील प्राप्त अर्ज पडताळणी करून तत्कालीन समितीने संबंधीत अर्जदारांचे नावे जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलेली आहेत. तसेच या समितीकडे प्राप्त अर्ज पडताळणी करून समितीने ही जात वैधता प्रमाणपत्रे निर्गमित केलेली आहेत. तथापि, अनेक अर्जदारांनी त्यांचे समितीकडे जमा असलेले मुळ जात प्रमाणपत्र तसेच ऑफलाईन निर्गमित जात वैधता प्रमाणपत्र हे अद्यापही समिती कार्यालयाकडून नेलेले नाही.

       तसेच समितीने अर्जाची तपासणी करताना जमा केलेले मुळ जात प्रमाणपत्र ज्यात समितीने ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहे. अशा अर्जदारांनीही अद्याप आपले मुळ जात प्रमाणपत्र परत नेलेले नाही. करीता सर्व संबंधीत अर्जदारांनी समितीकार्यालयात कार्यालयीन वेळेत आपण स्वत: अथवा आई-वडील, भाऊ- बहीण या पैकी एकयांनी येऊन जमा असलेले मुळ जात प्रमाणपत्र तसेच ऑफलाईनचे जात वैधता प्रमाणपत्र घेऊन जावे. येताना अर्जदाराचे व येणाऱ्या व्यक्तीचे (आई-वडील, भाऊ-बहीण) आधार कार्डाची मुळ व सांक्षांकीत प्रत सादर करावी. अर्जदाराने इतर नातेवाईक, पती, पत्नी, मित्र व इतर यांना प्राधिकृत पत्र दिल्याशिवाय पाठवू नये. असे  उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,  गडचिरोली ,डी. एन. धारगावे यांनी कळविले आहे.