बापट यांनी सोडविले वडेट्टीवारचे उपोषण

0
5

नागपूर दि, १४-विधानभवनाच्या पाय-यांवर उपोषणावर बसलेले कॉंग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार यांना संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी भेट दिली तसेच मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासनही दिले. गिरीष बापट यांनी वडेट्टीवार यांना ज्यूस प्यायला दिला व त्यांचे उपोषण सोडविले.

शेतक-यांच्या हक्कांसाठी कॉंग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार हे विधानभवनाच्या पाय-यांवर उपोषणाला बसले होते. संपूर्ण चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, धानाला ३ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा, ब्रम्हपुरी येथे एम. आय. डी. सी. मंजूर करण्यात यावी, सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ मंजूर करण्यात यावे, सिंदेवाही येथे नगरपंचायत मंजूर करावी, ब्रम्हपुरी येथे अनुसूचित जमातींच्या मुलींसाठी वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी निधीसह प्रशासकीय मान्यता मिळावी आदी मागण्यांसाठी ते आमरण उपोषण उपोषण करत असल्याची माहिती त्यांनी दिली होती.