कृतज्ञता सप्ताहानिमित्त राष्ट्रवादीने केला माजी आमदार हरिहरभाईचा सत्कार

0
10

गोंदिया,दि.23 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सप्ताहात माजी आमदार हरिहरभाई पटेल यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने सप्ताहानिमित्त जेष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यांतर्गत वयाची ८१ वर्षे पूर्ण केलेल्या माजी आमदार पटेल यांचा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्याद्वारे शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ व सम्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पटेल यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सम्मान करण्यात आला. याप्रसंगी पटेल यांनी, खासदार शरद पवार हे वेळ व्यक्तीची नाळ जाणून निर्णय घेत होते. त्यांनी गोंदियाच्या विकास कामात आम्हाला योग्य मदत केल्याचेही सांगीतले.
गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडियम, के.टी.एस.सामान्य रुग्णालयाला २00बेडचा दर्जा. त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाचा अनावरण पवार यांच्या हस्ते झाल्याची आठवण त्यांनी काढली. यावेळी राकाँचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, प्रवक्ता रवी मुंदडा, सूर्यकांत जायस्वाल, नरेंद्र हालानी, केतन तुरकर, विष्णू शर्मा, डॉ. मोहित गौतम, प्रतिक भालेराव, दीपक कनोजे, मो.आशिक युसूफ खान, सुखदेव डोहरे, नरेंद्र पटले, उमेश पटले आदी उपस्थित होते.