गंगाझरी वनविभागात आगप्रतिबंधक कामात गैरव्यवहार

0
20

गंगाझरी पोलिसात आरएफओसह इतराविरुंध्द तक्रार

गोंदिया,दि.१० -गोंदिया वनविभागातंर्गत येणाèया गंगाझरी वनविभागातंर्गत आगप्रतिबंधक रेषा(फायर लाईन)तयार करण्याच्या कामात बोगस मजुरांचा वापर केल्याबद्दल शिवाजी किरसान(रा.गोqवदटोला) या इसमाने आज(दि.१०)गंगाझरी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.विशेष म्हणजे या तक्रारीत बिटरक्षक बी.बी.सोनेकर,क्षेत्रसहाय्यक एस.बी.दुर्रानी व वनक्षेत्राधिकारी एस.के.चाटी यांच्याविरुद्ध शिवाजी सदाराम किरसान यांनी आज तक्रार दाखल केली आहे.याप्रकरणात येथील उपवनसरंक्षकांना या आदीच तक्रार देण्यात आली होती,परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.तक्रारीत १६ फेबुवारी २०१५ ते २८ फेबुवारी २०१५ या कालावधीत गैरअर्जदारांनी शिवाजी किरसाना यांच्या खोट्या नावाचा वापर करून व खोटी स्वाक्षरी करून ३४७७.५० पैसाची उचल केली.यावर आरटीआय कार्यकर्ते पुरण उके यांनी तपासणी केली असता आपण कामावर कधीच गेलो नसल्याचे व आपली स्वाक्षरी खोटी असल्याचे सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.आरटीआय कार्यकर्ते उके यांनी या आधीच केलेल्या तक्रारीत १ लाख ९५ हजार रुपयाची उचल करण्यात आली असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ६ जानेवारी २०१६ रोजी पुराव्यानिशी केली होती.जे गावात पाटील म्हणून ओळखले जातात आणि सधन आहेत त्यांची नावे मजुरांच्या यादीत घालून आणि त्यांच्या नावे पैसे काढून वनविभागाने फायर लाईन कामात कशाप्रकारे गैरप्रकार होते याचे उदाहरणच समोर आणले आहे.याप्रकरणी गंगाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस स्थानकाच्या वतीने देण्यात आली आहे.