पाच पोलिसांना भारत सरकारचे पोलिस शौर्यपदक जाहीर

0
10

गडचिरोली,दि.२५: अतिदुर्गम भागात जिवाची बाजी लावून नक्षल्यांशी झुंज देणाऱ्या जिल्हयातील पाच पोलिसांना भारत सरकारने पोलिस शौर्य पदक जाहीर केले आहे.

सहायक पोलिस निरीक्षक मनोहर हिरालाल कोरेटी, हवालदार चंद्रय्या मदनय्या गोदारी, शिपाई गंगाराम मदनय्या सिडाम, शिपाई नागेश्वर नारायण कुमराम व शिपाई बापू किष्टय्या सुरमवार अशी पोलिस शौर्यपदक जाहीर झालेल्यांची नावे असून, हे सर्वजण विशेष कृती दलात कार्यरत आहेत. हे पाच कर्मचारी ५ फेब्रुवारी २०१४ रोजी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना फारसेगड हद्दीतील मोठा काकलेर(छत्तीसगड) जंगलात नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. मात्र पोलिसांनी जोरदार प्रत्युतर देताच नक्षलवादी पळून गेले.