तिरोडा पंचायत समितीची आमसभा शुक्रवारला

0
16
 
तिरोडा दि. १0: येथील पंचायत समितीची आमसभा उद्या १२ फेबु्रवार रोजी दुपारी १ वाजता स्थानिक पंचायत समितीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेली आहे. आमसभेच्या अध्यक्षस्थानी तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले उपस्थित राहणार आहे. पंचायत समितीच्या सभापती उषा qकदरले, उपसभापती किशोरकुमार पारधी, पंचायत समितीचे सर्व सदस्य या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तथा सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी, पंचायत समितीचे कर्मचारी यांनी आमसभेत उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एच.एस. मानकर यांनी केले आहे.