मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत नेहा कापगते तिसरी

0
8
गोंदिया,दि. १० -राज्यस्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत नेहा भास्कर कापगते तिसरी आली. कनिष्ठ महाविद्यालयत गटात तिने हे यश संपादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगबाद येथे रविवारी ७ फेबु्रवारी रोजी पार पडली. नेहा कापगते अर्जुनी-मोर येथील सरस्वती विद्यालयात इयत्ता अकराव्या वर्गात शिकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो.डॉ.बी.ए. चोपडे यांच्या हस्ते २१ हजाराचा धनादेश, स्मृतीचिन्ह, ग्रामगीता आणि प्रमाणपत्र देवून तिचा गौरव करण्यात आला. पाणी व स्वच्छता विभागाचे उपसचिव शा.स. कुदळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. स्पर्धेत राज्यभरातील स्पर्धक सहभागी झाले होते. जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गावडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए. देशमुख, गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार, अनिल मंत्री, शिक्षक आय.एस. काशिवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे.