शिक्षकाने केली प्रकल्प कार्यालयाची तोडफोड 

0
14
देवरी दि.१०: येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाNया पांढराबोडी येथील अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत तत्कालीन शिक्षकाने मर्जीच्या ठिकाणी समायोजन न झाल्याने रागाच्या भरात आज बुधवारी (दि.१०) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास येथील प्रकल्प अधिकारी यांच्या दालनाचे कुलूप दगडाने फोडून आतील सामानाची नासधुस करून अधिकाNयाच्या खुर्चीला रस्त्यावर नेऊन पेâकले. या घटनेमुळे या कार्यालयातील कर्मचाNयांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सविस्तर असे की, पांढराबोडी येथील अनुदानित आश्रम शाळा सन २०१५ ला शासकीय निकषाची पुर्तता न केल्याने शासनस्तरावरून मान्यता काढून घेण्यात आली होती. यामुळे येथे कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाNयांना अतिरिक्त ठरवून सेवामुक्त करण्यात आले होते. त्यावेळी येथील कर्मचाNयांना उपलब्ध जागेनुसार इतरत्र समायोजित करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.
या प्रक्रियेचा एक भाग म्हणून सेवामुक्त झालेला शिक्षक मलई यास गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी प्रकल्प कार्यालयांतर्गत समायोजित करून रूजू होण्याचे आदेश सहा महिण्यापूर्वी देण्यात आले होते. परंतु सदर शिक्षकाने मर्जीच्या ठिकाणी आदेश न मिळाल्याने रूजू होण्यास नकार
 सदर शिक्षकाची पत्नी गोंदिया पोलिसात असल्यामुळे त्यास पती व पत्नी एकत्रीकरण कायद्यांतर्गत त्यास जिल्ह्यातच समायोजन हवे होते. परंतु जिल्हा अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय अथवा अनुदानित आश्रमशाळांमध्ये सदर शिक्षक पारंगत असलेल्या मराठी विषयाच्या जागा रिक्त नसल्यामुळे त्यास गोंदिया जिल्ह्यात समायोजन मिळू न शकल्याने त्यास अहेरी येथे पाठविण्यात आले होते.
या आदेशाचा विपर्यास करून आपणास जिल्हाबाहेर घालविल्या जात असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे त्याचा राग अनावर झाला आणि सदर आजची घटना घडली.