लायसेन क्लब प्रांताध्यक्षाची सद्भावना भेट

0
5

देवरी: लायसेन क्लब देवरीच्या अध्यक्ष शीला मारगाये यांनी प्रांताध्यक्ष मंजुश्री जायस्वाल यांच्या सद्भावना भेटीचे आयोजन माँ धुकेश्‍वरी मंदिराच्या सभागृहात केले होते. अध्यक्षस्थानी क्लबच्या अध्यक्ष शीला मारगाये होत्या. याप्रसंगी आरती चौरागडे, वेदांता गंगभोज, वैशाली संगीडवार, शांता धोटे, शालू राऊत आणि पदाधिकारी उपस्थित होते. महिलांकरिता विविध स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. या दरम्यान देवरी येथील गणेश चौकातील विधवा राऊत हिला साडी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सचिव वनिता दहिकर यांनी केलेल्या कार्याचा अहवाल वाचन करुन दाखविला. कोषाध्यक्ष पिंकी कटकवार यांनी क्लबच्या जमाखर्चाचे वाचन केले. मारगाये, आरती चौरागडे यांनी मार्गदर्शन केले. संचालन सुलभा भुते यांनी तर आभार सरोज शेंद्रे यांनी मानले. आयोजनाकरिता शुभांगी निनावे, शीतल सोनवाने, शुभांगी गोडसेलवार, ममता इरदंडे, नलिनी राऊत, संगीता पाटील, ज्योती लांजेवार, कमलेश्‍वरी गौतम, लक्ष्मी पंचमवार, प्रियंका पिंगळे, रोहिणी शाहू आणि सर्व सदस्यांनी सहकार्यकेले.