केटिएसमध्ये पहिल्यांदाच डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रीया

0
11

गोंदिया,दि. १६ : गोंदिया जिल्हयाची ओळख मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा अशीच. मात्र आरोग्य सेवेतून गरीब रुग्णांना दिलासा देण्याचे कामही जिल्हा शासकीय रुग्णालयातून आता होवू लागले आहे. महागडी शस्त्रक्रीया देखील आता केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत होवू लागल्याने जिल्हयाच्या मागासलेपणावर मात करण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी ठरत आहे. गरीबांची सेवा ईश्वर सेवा मानून आरोग्य यंत्रणेचे अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.
जिल्हयातील महालगांव येथील १२ वर्षीय विद्यार्थी आदित्य नागपूरे याला जन्मजात तिरळेपणा. आर्थिक परिस्थीती बेताचीच असल्यामुळे आदित्यचे पालक खाजगी रुग्णालयात तिरळेपणाची महागडी शस्त्रक्रीया करु शकले नसते. मात्र राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले. १२ वर्षीय आदित्यवर तिरळेपणा दूर करण्याची अवघड शस्त्रक्रीया नेत्र शल्यचिकित्सक डॉ. निकिता पोयाम, डॉ. स्नेहल कोकोडे यांनी नुकतीच पार पाडली.
शस्त्रक्रीया यशस्वीपणे पार पाडण्याकरीता वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. राजेन्द्र जैन, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल परियाल, नोडल अधिकारी तथा निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहयसंपर्क) डॉ. विनोद वाघमारे, डॉ. बी.डी.जायसवाल, संजय बिसेन पर्यवेक्षक,अनिरुध्द शर्मा, सांख्यिकी सहाय्यक प्रियंका मडामेकर, कार्यक्रम सहाय्यक डॉ. योगेश पटले, डॉ. दिशा पटेल, वैद्यकीय अधिकारी) निखील लांजेवार औषधी निर्माता, दिमन रहांगडाले, ए.एन.एम. निशांत बन्सोड,सांख्यिकी सहाय्यक, सर्व कुंवर तिलकसिंह सामान्य रुग्णालय,गोंदिया इत्यादीने अथक परिश्रम घेतले.