अदानीतील परप्रांतीय मजुरांना हाकलून लावा- आमदार रवी राणा

0
7
गोंदिया,दि.२१ :स्थानिक उद्योगामध्ये स्थानिक बेरोजगारानाच रोजगार देणे क्रमप्राप्त असतानाही, अदानीसारख्या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळाला नाही.याउलट परप्रांतीयांना मजुरांना मोठ्याप्रमाणात अदानी समुहाने कामावर घेऊन स्थानिकावर अन्याय केला आहे.त्यामुळे युवा स्वाभीमान येत्या काळात अदानीतील परप्रातींय मजूरांना हाकलून लावून स्थानिकांना रोजगार देण्यासाठी भूमिका घेईल असे युवा स्वाभीमानचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी म्हटले.सोबतच भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी भेलप्रकल्प रखडला आहे त्याला सुरू करून स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, ही मागणी आपण स्वत:मुख्यमंत्रीकडे करणार असल्याचेही सांगितले.
गोंदिया युवा स्वाभिमानतर्फे रविवारी ( दि.२१) गणेशनगर येथील शारदा कॉन्वेंटच्या प्रांगणात युवा जागृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाला युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, सेवानिवृत्त समाजकल्याण उपायुक्त अनिल देशमुख, नागपुरचे जिल्हाध्यक्ष शेखर बिसेन, वाय.पी. येळे, संचालक भुवन बिसेन, पो. पा. हेतराम रहांगडाले, शैलेश मानकर आदी मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविकातून जितेश राणे यांनी युवा स्वाभिमानच्या बळकटीकरणाची पाश्र्वभूमी मांडून भूमिका स्पष्ट  केली.
यावेळी पुढे बोलतांना आ.राणा म्हणले की,नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण या समीकरणातून बारा वर्षापूर्वी युवा स्वाभिमानची अमरावती जिल्हयात पेरणी करण्यात आली. आजघडीला गावापासून मोठ्या शहरापर्यंत युवा स्वाभिमानरूपी रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. गरिब, शेतकरी,शेतमजुर, सुशिक्षीत बेरोजगार आणि तळागाळातील सर्वसामान्य जनतेसाठी ही संघटना तत्पर आहे. गरिबांचे अश्रू पुसणे हे युवा स्वाभिमानचे ध्येय आहे.
आमदार राणा पुढे म्हणाले की, युवा स्वाभिमान ही केवळ संघटना नाही तर विचारांची चळवळ आहे. कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वसामान्य गरिबजनतेसाठी लढावे. प्रसंगी त्यांच्या समस्यांसाठी रस्त्यावर देखील उतरण्याची तयारी ठेवावी.
शेतकèयांच्या प्रश्नांना वाचा फोडताना अटक झाली तरी चालेल परंतु शेतकèयांसाठी संपूर्ण ताकदीने कार्यकर्त्यांनी आंदोलन उभारावे. नुसती गर्दी नको तर दर्दी कार्यकर्ते असावेत ज्यांना समाजातील समस्यांची जाण आहे. महागडी शस्त्रक्रिया, अपूर्ण शिक्षण अशा समस्या असल्यास नागरिकांनी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावे त्यांचे निःशुल्क उपचार करून देण्यात येईल. पैशासाठी शिक्षण सोडणाèया गरिब विद्याथ्र्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल.
दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील गरिबांसाठी लवकरच मोफत रूग्णवाहिका पुरविण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. वेगळा विदर्भ करण्याचे भाजपने वचन दिले होते परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.मुख्यमंत्री चांगले आहेत,परंतु त्यांची चमू कमजोर असल्याने जनतेची कामे होत नाही.त्यातच विदर्भाच्या भूमिकेला बगल दिल्यामूळे त्यांची नाचक्की होऊ लागली आहे. वेगळा विदर्भ न केल्यास भाजपला मतदार जागा दाखवतील असा टोलाही राणा यांनी लावला.संचालन प्रा. सुनिल वाघमारे यांनी केले तर आभार धनजित बैस यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.