जिल्हा क्रिडा संकुलाला राष्ट्रवादीने दिले चक्रवर्ती राजाभोजचे नाव

0
15
गोंदिया,दि. २१ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल तसेच गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या काही काळापासून गोंदियात अत्याधुनिक सुविधाने सज्ज होत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाला पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. परंतु राज्य शासनाने याकडे काणाडोळा केल्याने या मागणीला पुर्णविराम देत आज रविवारी (ता.२१) चक्रवर्ती सम्राट राजाभोज जयंतीचे औचित्य साधून चक्रवर्ती सम्राट राजाभोज जिल्हा क्रीडा संकुल नामफलकाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
खा.पटेल यांनी गोंदिया परिसरात बहुसंख्येने वास्तव्यास असलेल्या पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांचे नाव जिल्हा क्रीडा संकुलाला देण्यात यावे, अशी मागणी राज्यशासनाकडे लावून धरली होती. आमदार राजेंद्र जैन यांनी विधानपरिषदेत हा प्रश्न लावून धरला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रफुल्ल पटेलांची मागणी मान्य करून संबंधित विभागाला गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलाला चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांचे नाव देण्याविषयी निर्देश दिले होते. तसे पत्र सुद्धा प्रफुल्ल पटेल यांना पाठविले होते. परंतु राज्यातील सत्ता बदलून स्थानापन्न झालेल्या भाजपा सरकारने गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलाला चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांचे नाव देण्याविषयी काहीही हालचाल केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा संकुल परिसरात नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
तत्पूर्वी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आज या विषयी झालेल्या सभेत आमदार राजेंद्र जैन म्हणाले, आता आम्ही शासनाकडे जिल्हा क्रीडा संकुलाला चक्रवर्ती राजाभोज यांचे नाव द्या, अशी मागणी करणार नाही. यापुढे चक्रवर्ती सम्राट राजाभोज जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया असाच उल्लेख करण्यात येईल.
१४ एप्रिल रोजी गोंदिया येथे होऊ घातलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाला  परम पूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा नामफलकाचे अनावरण करण्यात येईल, असे आमदार राजेंद्र जैन यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार दिलीप बन्सोड, नरेश माहेश्वरी, बबलू कटरे, विनोद हरिणखेडे, मनोहर चंद्रिकापुरे, छाया चौव्हाण,राजलक्ष्मी तुरकर यांनीही मार्गदर्शन केले. सभेचे संचालन शिव शर्मा यांनी केले. गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापासून जिल्हा क्रीडा संकुलापर्यंत शेकडो लोकांची रॅली काढण्यात आली. रॅली जिल्हा क्रीडा संकुलात पोहोचून चक्रवर्ती सम्राट राजाभोज जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी माजी आमदार दिलीप बन्सोड, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरा‘कर, देवेंद्रनाथ चौबे, महेश जैन, पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रिकापुरे, हिरालाल चौव्हाण, बबलू कटरे, कुंदन कटारे, प्रभाकर दोनोडे, अविनाश काशीवार, छोटू पटले, जितेश टेंभरे, राजेश चौव्हाण, छाया चौव्हाण, खुशबू टेंभरे, प्रेम रहांगडाले, उषा िकदरले, देवचंद तरोणे, दुर्गा तिराले, रजनी गौतम, सुशीला भालेराव, कैलाश पटले, सुरेश हर्षे, केतन तुरकर, जियालाल पंधरे,बी.डब्लू कटरे,खुशाल कटरे,मुक्तानंद पटले,केवल बघेले,मनोज शरणागत,पंकज पटेल,डाॅ.किशोर पारधी, कैलास पटले, मनोज डोंगरे,प्रिया हरिणखेेडे,प्रिती रामटेके,डाॅ.विनोद पटले,बरडे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.