विश्व उत्कृष्ट बुद्धिस्ट नेतृत्व पुरस्काराने ना. बडोले सन्मानित

0
6

– आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संस्था थायलंडतर्फे सत्कार
गोंदिया : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना २३ फेबु्रवारी रोजी थायलंड येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संस्थेतर्फे ‘दी वल्र्ड बुद्धिस्ट आउटस्टेंqडग लीडर अवॉर्डङ्क या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ना. बडोले यांच्या कार्याची दखल घेत त्यांची जागतिक स्तरावरच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. ना. बडोले हे थायलंड येथे २२ व २३ फेबु्रवारी या दोन दिवसीय समारंभात सपत्नीक उपस्थित झाले होते. विश्वस्तरावर थायलंड येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संस्था १०० हून अधिक विद्यापीठ तसेच ५ हजाराहून अधिक सक्रिय सदस्यांच्या माध्यमातून अंतर्गत शांती शिक्षण व धुम्रपान, मद्यापानामुळे होणाèया दुष्परिणामावर कार्य करीत आहे. तसेच मागील ३३ वर्षांपासून ही संस्था सकारात्मक व्यवहार बदलात सहभाग, राष्ट्रीयत्व व सार्वभौमता या नैतिक मूल्यांवर कार्य करीत असून दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाèया विद्याथ्र्यांचा सत्कार व विश्वस्तरीय उत्कृष्ट बुद्धिस्ट नेतृत्व करणाèयांचा सन्मान करते. ना. बडोले यांच्या जागतिक स्तरावरील सत्कारावर त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.