विकासाचा पूर्वरंग पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

0
31

नागपूर : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सचित्र माहितीसह विभागातील उद्योग, पर्यटनासह वर्षभरातील प्रगतीचा आढावा घेणाऱ्या ‘आकर्षक विकासाचा पूर्वरंग’ या पुस्तिकेचे प्रकाशन रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक माहिती व जनसंपर्क कार्यालयातर्फे नागपूर विभागातील एका वर्षातील प्रगतीचा आढावा घेणारी सचित्र व माहितीपूर्ण ‘विकासाचा पूर्वरंग’ ही पुस्तिका तयार केली आहे. सामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासोबत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासकामांची या पुस्तिकेद्वारे उपलब्ध झाली आहे. ही पुस्तिका अत्यंत सुबक व माहिती पूर्ण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रारंभी माहिती संचालक मोहन राठोड यांनी ‘विकासाचा पूर्वरंग’ या पुस्तिकेसंदर्भात माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या एक वर्षाच्या कार्यकाळात घेतलेल्या विविध कल्याणकारी निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी संदर्भातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे.

वर्षपूर्तीनिमित्त शासनाने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना विदर्भातील पर्यटन, विकासाची माहिती तसेच औद्योगिक विकासासाठी राबविलेल्या विविध उपक्रमामुळे उद्योजकांना येथे उद्योग सुरु करण्यासाठी मिळत असलेले प्रोत्साहन, अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र, देवळी, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा यासारख्या मागास भागात उद्योग प्रगतीतील चालना मिळत आहे.

स्वच्छ महाराष्ट्र राजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबीर, सावकारी कर्जातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, जलयुक्त शिवार आदी योजनाच्या प्रगतीचा व प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आलेख या पुस्तकात घेण्यात आला आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे (नागपूर), अनिल गडेकर (वर्धा), विवेक खडसे (गोंदिया) उपस्थित होते.