आरटीओकडून स्लिपर कोच बसेसची विशेष तपासणी मोहिम

0
19

खाजगी ट्रॅव्हल्सनी प्रवाशांकडून आकारावयाचे भाडेदर निश्चित

जादा भाडे आकारल्यास बस चालक व मालकांविरुध्द होणार कारवाई

         वाशिम, दि. 18  :  जिल्हयात स्लिपर कोच बसेसची विशेष तपासणी मोहिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबविण्यात येत आहे. तपासणीदरम्यान 17 ऑक्टोबरपर्यंत 216 खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली. 59 खाजगी बसेसवर मोटार वाहन कायदयाअंतर्गत कार्यवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान खाजगी बसेसवर दंड आकारुन 1 लक्ष 72 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला. या तपासणी मोहिमेदरम्यान जादा भाडे आकारल्याचे आढळून आले नाही. तसेच प्रवाशांकडून जादा भाडे आकारणी केल्याची तक्रार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झाली नाही. प्रवास करणाऱ्या प्रवशांकडून जादा भाडे आकारणीची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित खाजगी ट्रॅव्हल्सवर मोटार वाहन कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खाजगी ट्रॅव्हल्सकरीता असणारे भाडे दर पुढीप्रमाणे निश्चित केले आहे.

          नॉनएसी निमआराम सिटर 2.94 रुपये प्रति कि.मी., एसी सिटर टाटा/ अशोक लेलॅन्ड 3.23 प्रति कि.मी. एसी सिटर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनिया 4.85 रुपये प्रति कि.मी., नॉनएसी स्लिपर 2.94 रुपये प्रति. कि.मी., एसी स्लिपर टाटा/अशोक लेलॅन्ड 3.75 रुपये प्रति कि.मी. व एसी स्लिपर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनिया 5.80 रुपये प्रति कि.मी. याप्रमाणे दर निश्चित केले आहे.

          वाशिम येथून नागपूरकरीता 285 कि.मी. अंतरासाठी निमआरामचे भाडे 838 रुपये, एसी सिटर टाटा/अशोक लेलॅन्ड 920 रुपये, एसी सिटर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियाकरीता 1382 रुपये, नॉनएसी स्लिपर 838 रुपये, एसी स्लिपर टाटा/अशोक लेलॅन्ड 1069 रुपये आणि एसी स्लिपर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियासाठी 1653 रुपये. वाशिम येथून पुण्याकरीता 460 कि.मी. अंतरासाठी नॉनएसी निमआरामचे भाडे 1353 रुपये, एसी सिटर टाटा/अशोक लेलॅन्ड 1486 रुपये, एसी सिटर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियाकरीता 2231 रुपये, नॉनएसी स्लिपर 1353 रुपये, एसी स्लिपर टाटा/अशोक लेलॅन्ड 1725 रुपये आणि एसी स्लिपर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियासाठी 2668 रुपये. वाशिम येथून मंबईकरीता 590 कि.मी. अंतरासाठी नॉनएसी निमआरामचे भाडे 1735 रुपये, एसी सिटर टाटा/अशोक लेलॅन्ड 1906 रुपये, एसी सिटर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियाकरीता 2862 रुपये, नॉनएसी स्लिपर 1735 रुपये, एसी स्लिपर टाटा/अशोक लेलॅन्ड 2212 रुपये आणि एसी स्लिपर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियासाठी 3422 रुपये. वाशिम येथून कोल्हापूरकरीता 630 कि.मी. अंतरासाठी नॉनएसी निमआरामचे भाडे 1752 रुपये, एसी सिटर टाटा/अशोक लेलॅन्ड 2035 रुपये, एसी सिटर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियाकरीता 3055 रुपये, नॉनएसी स्लिपर 1852 रुपये, एसी स्लिपर टाटा/अशोक लेलॅन्ड 2362 रुपये आणि एसी स्लिपर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियासाठी 3654 रुपये.

           वाशिम येथून सुरतकरीता 570 कि.मी. अंतरासाठी नॉनएसी निमआरामचे भाडे 1676 रुपये, एसी सिटर टाटा/अशोक लेलॅन्ड 1841 रुपये, एसी सिटर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियाकरीता 2765 रुपये, नॉनएसी स्लिपर 1676 रुपये, एसी स्लिपर टाटा/अशोक लेलॅन्ड 2138 रुपये आणि एसी स्लिपर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियासाठी 3306 रुपये. वाशिम येथून सोलापूरकरीता 400 कि.मी. अंतरासाठी नॉनएसी निमआरामचे भाडे 1176 रुपये, एसी सिटर टाटा/अशोक लेलॅन्ड 1292 रुपये, एसी सिटर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियाकरीता 1940 रुपये, नॉनएसी स्लिपर 1176 रुपये, एसी स्लिपर टाटा/अशोक लेलॅन्ड 1500 रुपये आणि एसी स्लिपर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियासाठी 2320 रुपये. वाशिम येथून हैद्राबादकरीता 420 कि.मी. अंतरासाठी नॉनएसी निमआरामचे भाडे 1235 रुपये, एसी सिटर टाटा/अशोक लेलॅन्ड 1357 रुपये, एसी सिटर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियाकरीता 2037 रुपये, नॉनएसी स्लिपर 1235 रुपये, एसी स्लिपर टाटा/अशोक लेलॅन्ड 1575 रुपये आणि एसी स्लिपर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियासाठी 2436 रुपये. वाशिम येथून लातूरकरीता 240 कि.मी. अंतरासाठी नॉनएसी निमआरामचे भाडे 1588 रुपये, एसी सिटर टाटा/अशोक लेलॅन्ड 775 रुपये, एसी सिटर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियाकरीता 1164 रुपये, नॉनएसी स्लिपर 1588 रुपये, एसी स्लिपर टाटा/अशोक लेलॅन्ड 900 रुपये आणि एसी स्लिपर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियासाठी 1392 रुपये आणि वाशिम येथून नांदेडकरीता 160 कि.मी. अंतरासाठी नॉनएसी निमआरामचे भाडे 470 रुपये, एसी सिटर टाटा/अशोक लेलॅन्ड 517 रुपये, एसी सिटर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियाकरीता 776 रुपये, नॉनएसी स्लिपर 470 रुपये, एसी स्लिपर टाटा/अशोक लेलॅन्ड 600 रुपये आणि एसी स्लिपर व्होल्वो/ मर्सिडीज/ स्कॅनियासाठी 928 रुपये असे भाडे दर निश्चित करण्यात आले आहे.

           अधिक भाडे आकारल्यास हेल्पलाईन क्रमांक 02262242666, टोल फ्री क्रमांक 18001208040 आणि [email protected] या संकेतस्थळावर तक्रार करता येईल. बस वाहन रस्त्यावर चालवित असतांना तपासणी दरम्यान प्रवशांकडून जादा भाडे आकारल्याचे दिसून आल्यास बसचे चालक व मालकांविरुध्द नियमानूसार कारवाई करण्यात येईल. 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत एसटी महामंडळाचे प्रवास भाडे दर 10 टक्के अधिक आकारण्यात येत असल्याने खाजगी प्रवासी भाडे दरापेक्षा 10 टक्के अधिक भाडे आकारण्याची खाजगी बस वाहतूकदारांना मुभा राहील. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.