एनएमडी लॉ कॉलेजमध्ये लीगल सेंटर ओपनिंग कार्यक्रम

0
21

गोंदिया, दि.07 : पॅन इंडिया’, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने “कायदे विषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण” आणि “हक हमारा भी तो हैं @75” तथा राष्ट्रीय लोक अदालत प्रसार मोहीम अंतर्गत एन एम डी लॉ कॉलेज गोंदिया येथे लॉ कॉलेज मध्ये लीगल सेंटर ओपनिंग कार्यक्रम घेण्यात आला.

             सदर लीगल सेंटर ओपनिंग कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांसी संवाद साधताना दिवाणी न्यायधीश, वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया एस. व्ही. पिंपळे यांनी आपल्या मार्गदर्शनात सद्यस्थितीत न्यायपालिका व भारतीय संविधान यांचे कार्य सामाजिक व्यवस्थेला कशाप्रकारे बदलू शकतात व न्यायपालिका व विधी सेवा यावर विद्यार्थ्यांना संवाद साधला.

            सदर कार्यक्रमाला एन.एम.डी लॉ कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती शारदा महाजन, लॉ विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुयोग इंगळे व व्याख्याता डॉ. योगेश बैस उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उमेश उदापुरे व आभार प्रदर्शन डॉ. अश्विनी दलाल यांनी केले.  सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अधीक्षक आर. जे. ठाकरे, ए. एम. गजापुरे, एस एम कठाणे, एस. डी. गेडाम, पी. एन. गजभिये, बबलू पारधी, पी.एल.व्ही आर. जे. पटले व यु. यु शहारे यांनी सहकार्य केले.