प्रभागातील समस्या न सोडविल्यास उपोषणाचा इशारा

0
16

भंडारा,दि.29- येथील नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये येणार्या विविध समस्यांचे निराकारण येत्या 15 दिवसात न करण्यात आल्यास उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक महेंद्र निबांर्ते यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.आज सोमवारला त्यांनी  मुख्याधिकारी यांच्याशी भंडारा शहरातील समस्या संदर्भात भेट घेऊन चर्चा केली.चर्चेच्यावेळी  प्रभाग क्रमांक 5 मधील समस्यांसह मैदा मिलच्या मागील उखडलेल्या रस्त्या दुुरुस्त करण्यात यावे.शहरातील अतिक्रमण हटविण्यात येऊन  खांबतलाव जवळील वस्तीमधिल सांडपाण्याची व्यवस्था करणे. सफाई व्यवस्थेसाठी घंटागाडी नियमित सुरु ठेवणे शहरातील बगीच्यांचे सौंदर्यीकरण करणे आदी बांबीवर चर्चा करण्यात आली.यावेळी नगराध्यक बाबूराव बागडे, मुख्याधिकारी रवींद देवतळे  यांच्यासह शम्मी शेख, रूबी चड्ढा, प्रवीण उदापुरे, बंटी अग्रवाल, चेतन चेटूले, नितिन निनावे, पवन भोले इत्यादि कार्यकर्ता उपस्थित होते.