तिरोडा वगळून कामठीला विदर्भचा थांबा मंजूर

0
13

गोंदिया,दि.04-दक्षिण मध्य पुर्व रेल्वेच्या नागपूर मंडळाच्यावतीने गोंदिया ते मुंबई या विदर्भ एक्सप्रेस रेल्वेगाडीला अनेक दिवसापासून तिरोडा येथे थांबा देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.त्यातच तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांनी तर रेल्वेप्रशासनाला तिरोडा येथे थांबा देण्यासंबधी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता.तेव्हा रेल्वेच्या अधिकार्यानी आश्वासन देत आ.रहागंडाले यांच्या आंदोलनाला थांबविले होते.परंतु आज शुक्रवारला दक्षिण मध्य पुर्व रेल्वेच्या नागपूर मंडळाच्यावतीने प्रसिध्दीला देण्यात आलेल्या पत्रकात रेल्वे प्रवासी यांत्रेकरुंच्या मागणीचा विचार करीत विदर्भ एक्सप्रेस रेल्वेला कामठी येथे तर पुरी-हटिया -पुरी एक्सप्रेस रेल्वेगाडीला राजनांदगाव येथे थांबा मंजुर करण्यात आल्याचे  कळविण्यात आले आहे.कामठी येथे विदर्भ एक्सप्रेस 17 मार्चपासून तर राजनादगाव येथे 22 मार्च पासून हटिया एक्सप्रेसला सहा महिन्यासाठी थांबा देण्यात आल्याचे म्हटले आहे.